शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

जुळून आल्या रेशीमगाठी! घरात झाल्या सप्तपदी अन् घुमले मंगलाष्टकांचे स्वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 21:55 IST

कोरोनामुळे घरातच मुहूर्त साधत केले कन्यादान 

ठळक मुद्देसमाजाला एक वेगळा आदर्श घालून देत जमावबंदीची पायमल्ली करणाऱ्या महाभागांना सणसणीत चपराक

 बेलाजी पात्रे -

वाकड : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाचे सर्वच स्तरावर दुरगामी परिणाम झाले आहेत. या महाभीषण संकटामुळे छोट्या  मोठ्या उद्योग धंद्यांसह सगळ्यांनाच अडचणीत आणले . त्याचसोबत समाजातले अनेक मंगलकार्ये, धार्मिक सोहळे यांच्यावर देखील संक्रांत कोसळली..मात्र या गंभीर परिस्थिती देखील समाजभान जपण्याची जबाबदारी काहीजण उचलतात आणि समाजात एक आदर्श  निर्माण करतात. त्याच पार्श्वभूमीवर घडलेली घटना म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक भान ठेवत नेरेतील (मुळशी) पित्याने कुठलाही गाजावाजा न करता आपल्या लाडक्या एकुलत्या एक कन्येचे राहत्या घरातुनच कन्यादान करत विवाह सोहळा पार पाडला. या कौतुकास्पद कृतीतून या कुटुंबांनी समाजाला एक वेगळा आदर्श घालून देत जमावबंदीची पायमल्ली करणाऱ्या महाभागांना सणसणीत चपराक लगावली आहे.  प्रेरणा शिक्षण संस्थेच्या तुकाई माध्यमिक विद्यालयात सेवक असलेल्या अनिल जाधव यांची कन्या मेनका उर्फ अस्मिता हिचे कुसगाव (मावळ) येथील राजाराम केदारी यांचे यांचे चिरंजीव अनिकेत यांच्याशी रेशीमगाठी जुळली. त्यानुसार ८ डिसेंबर २०१९ रोजी साखरपुडा संपन्न झाला आणि याच बैठकीत १५ एप्रिल ही लग्नाची तारीख देखील पक्की झाल्याने जाधव आणि केदारी या दोनही घरी आनंदाचे वातावरण होते. जस-जशी लग्न घटिका समीप येत होती तसे घरात मांडव वारे वाहू लागले, लग्नाची लगबग सुरू झाली मात्र पुढे मार्च महिना आला आणि सर्व आनंदावर विरजण पडले. जनता कर्फ्यु व लॉक डाऊनमुळे सर्व लग्न सोहळ्यावर निर्बंध आले, संपूर्ण नियोजन ढासळले. लग्न पुढे ढकलण्याच्या घालमिलीत दोनही कुटुंब असताना अखेर वधू पिता अनिल जाधव यांनी पुढाकार घेत परस्थितीचे गांभिर्य सर्वांच्या लक्षात आणून देत कुठलाही थाट माट न करता घरातील सदस्यांसमवेत घरीच मुलीचे हात पिवळे करून देण्याचा पर्याय ठेवला. या निर्णयाचे वर अनिकेत व त्यांच्या कुटीबीयांनी तसेच वधू मेनका यांनी स्वागत केले त्यामुळे केवळ घराच्या सदस्यांच्या साक्षीने अगदी साध्या पद्धतीने सकाळच्या मुहूर्तावर विवाह सोहळा संपन्न झाला. मात्र, यावेळी देखील सोशल डिस्टन्सचे नियम सर्व पाळण्यात आले.  सामाजिक जबाबदारीचे व सुरक्षिततेचे भान ठेवून वऱ्हाडी , बँडबजा, जेवणावळीच्या पंक्ती, मिरवणूक, सनई- चौघडांच्या विरहित घरातूनच मंगलाष्टकांचे स्वर घुमले. हा अजब व सामाजिक संदेश देणारा लग्न सोहळा पार पडल्याने पंचक्रोशीतुन जाधव आणि केदारी कुटुंबियांच्या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwakadवाकडmarriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस