आणे येथे महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण

By Admin | Updated: January 14, 2017 03:07 IST2017-01-14T03:07:48+5:302017-01-14T03:07:48+5:30

आणे (ता.जुन्नर) येथील गावकामगार तलाठी व अन्य दोन सहकारी तलाठ्यांच्या पथकाला शुक्रवारी रात्री वाळु वाहतुकीचा ट्रकचा

And assaulted the revenue workers here | आणे येथे महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण

आणे येथे महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण

बेल्हा : आणे (ता.जुन्नर) येथील गावकामगार तलाठी व अन्य दोन सहकारी तलाठ्यांच्या पथकाला शुक्रवारी रात्री वाळु वाहतुकीचा ट्रकचा चालक व दुसऱ्या कार मधील काहींनी या पथकातील कर्मचाऱ्यांना वाळुची पावती विचारली तसेच तपासणी केली. याचा राग धरून या तिघांनी तलाठ्यांना मारहान तसेच शिविगाळ केल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला आहे.
महसूल विभागाचे पथक रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी आणेच्या हद्दित कल्याण-नगर महामार्गवर थांबले होते. या वेळी वाळु वाहतुकीच्या हायवा ट्रक (एम. एच. ०५ ए. एम. १५६०) या चालकाकडे महसूल विभागाच्या पथकाने वाळुची पावती विचारली व तपासणी करण्या करता गेले असता, संबंधित हायवा ट्रक चालकाने व झायलो कार मधील (एम. एच. १६ ए. पी. ८२४८) इसमांनी महसुल विभागाच्या पथकातील अनिल सुभाष निकम, वैभव दतात्रय डोंगरे, विजयकुमार गजानन साळवे या तीन तलाठ्यांना शिवीगाळ, दमदाटी, हाताने मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी देत व सरकारी कामात अडथळा आणला.
या कारणावरून आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद अनिल सुभाष निकम यांनी दाखल केली आहे. (वार्ताहर)

Web Title: And assaulted the revenue workers here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.