शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

डाळिंब बागांवर फिरवला नांगर, उत्पादन खर्चही निघत नसल्याने हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 1:34 AM

इंदापूर : आतापर्यंत ज्या डाळिंबाच्या बागांनी शेतकºयांना लखोपती केले. त्यांना चांगले दिवस आणले, त्याच डाळिंबाच्या बागा आता भाव नसल्याने शेतकºयांना कर्जबाजारी करू लागल्या आहेत.

इंदापूर : आतापर्यंत ज्या डाळिंबाच्या बागांनी शेतकºयांना लखोपती केले. त्यांना चांगले दिवस आणले, त्याच डाळिंबाच्या बागा आता भाव नसल्याने शेतकºयांना कर्जबाजारी करू लागल्या आहेत. त्यामुळे डाळिंबाचे आगार समजल्या जाणाºया इंदापूर तालुक्यात आता डाळिंबाच्या बागांच्या चिता पेटू लागल्या आहेत. शेकडो एकरांवर उभा असलेल्या डाळिंब बागांवर शेतकरी नांगर फिरवत असल्याचे चित्र आहे.नगदी व पैसे मिळवून देण्याची हमी असणारे पीक म्हणून ओळखले जात असलेल्या डाळिंबाच्या पिकाने गेल्या पाच वर्षांत उसाची जागा घेतली. सध्या तालुक्यात तेवीस हजार ते पंचवीस हजार एकरांवर डाळिंबाच्या क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्यात आली आहे. अल्पभूधारक शेतकºयांपासून बड्या बागायतदार शेतकरी डाळिंब उत्पादक झाले आहे. इंदापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची मोठी बाजारपेठ आहे. रोख व्यवहार असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी फायद्यात होते. तालुक्यातील डाळिंबाची गोडी सातासमुद्रापार गेली होती. चीनच्या काही व्यापाºयांनी इंदापूरमधील डाळिंबाच्या बागेत येऊन डाळिंब खरेदी केली होती.या बागा जोपासताना आलेल्या अनेक संकटांना धीराने तोंड देत शेतकरी या संकटांना तोंड देत बागा जगवत होते. दुष्काळात पाणी कमी पडल्यावर टँकरने पाणी आणून बागा जगवल्या. भाव चांगला मिळत असल्याने खर्चाचा विचार न करता बागा जगविल्या जात होत्या.मात्र, गेल्या दोन वर्षांपासून दरात सतत घसरण होत राहिली. डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला. त्यातच तेल्या, मर अशा रोगांचा प्रादुर्भाव झाला. उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली. घटलेले उत्पादन, वाढलेला खर्च व अत्यल्प बाजारभाव यामुळे शेतकरी हतबल झाला. चांगल्या प्रतीच्या डाळिंबांना पंधरा ते वीस रुपये भाव मिळू लागला. झालेला खर्च ही निघेना. हतबल झालेल्या शेतकºयांनी बागा मोडल्या. त्यावर नांगर फिरविला. चार - चार वर्षे जपलेली झाडे मोडून काढली.तालुक्यातील गोतोंडी येथील महादेव शेंडे यांची पाच एकर डाळिंबाची बाग होती. ती जगविण्यासाठी त्याने पाच किलोमीटर अंतरावरुन जलवाहिनी आणली होती. पाच वर्षांपासून ते डाळींब पिकाचे उत्पादन घेत होते. सध्या भाव नसल्याने त्यांनी सर्व पाच ही एकर बाग नांगरून काढली आहे.कमी भाव व त्यात अनेक रोगांना बळी पडत असल्याने शेतकरी डाळिंबाच्या बागा मोडून त्या ठिकाणी दुसरे पीक घेत आहेत. तालुक्यातील तेवीस ते पंचवीस हजार एकरावर डाळिंबाचे क्षेत्र होते. मात्र, तीस टक्क्याहून अधिक बागा शेतकºयांनी मोडून टाकल्याचे कृषी अधिकारी शंकर शेंडे यांनी सांगितले.डाळिंबाच्या बागांना नेहमीच औषध फवारणी करावी लागते. त्यामुळे या परिसरातील शेती औषध विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मात्र, सध्या यात घट झाली आहे. याचा मोठा फटका औषध विक्रेत्यांना बसला आहे, असे कृषी औषध विक्री केंद्र चालक मधुकर यादव यांनी सांगितले.निमगाव केतकी येथील पांडुरंग हेगडे यांनी सात एकरांवरची डाळिंबाची बाग नांगरली आहे. सध्याचा वाढलेला प्रचंड खर्च पाहता किलोला किमान ५० रुपये भाव मिळाला पाहिजे. परंतु, दर्जेदार डाळिंबाससुद्धा २० रुपयांच्या आत भाव मिळत आहे. २३ किलोंच्या क्रेटला २०० ते ३०० एवढा मातीमोल भाव मिळतो आहे. त्यामुळे खर्च हाताबाहेर गेल्याने त्यानी सात एकर बाग काढून टाकली आहे. वाळलेली झाडे जाळून टाकत आहोत, असे पाडुरंग हेगडे यांनी सांगितले.डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याच्या निर्यातीवर अनेक निर्बंध लावण्यात आले.त्यामुळे हा परिणाम होत आहे. सरकार ठिबकला अनुदान देते. बागांनाही अनुदान देते. मात्र तयार झालेल्या मालास योग्य भाव व त्याच्या मार्केटिंगकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकºयांवर ही वेळ आली आहे,असे जाणकारांचे मत आहे.