पुणे : शहर काँग्रेसकडून डावलण्यात आलेल्या आमदार अनंत गाडगीळ यांनी अखेर आमदार कोट्यातून प्रदेश प्रतिनिधी म्हणून आपली वर्णी लावून घेतली. आता शहरातील तथाकथीत पदाधिकार्यांना आपली ताकद कळाली कसेल, अशा मोजक्या शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. थेट दिल्ली कनेक्शन वापरून गाडगीळ यांनी हा ताकदीचा प्रयोग केला असल्याची चर्चा आहे. पुण्यात भाजपावतर कायम टोकदार टीका करणारे गाडगीळ त्यांना प्रदेश प्रतिनिधी म्हणून डावलण्यात आल्याने संतप्त झाले होते. काँग्रेसचे काम करणारी आमची ही तिसरी पिढी आहे. काल परवा पक्षात आलेले, राहतील की नाही, याची शंका असलेल्यांना संधी दिली जाते, अशी टीका त्यांनी केली होती.गाडगीळांना पाण्यात पाहतात ते नंतर राजकारणातून दिसेनासे होतात हा इतिहास असल्याचे विरोध कराणार्यांनी लक्षात ठेवावे असे त्यांनी ठणकावून सांगितले. गाडगीळ यांचे नाव रात्री उशिरा मुंबईत टिळक भवन येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. दरम्यान अजूनही राज्यातील काही जिल्ह्याची निवड बाकी असल्याचे समजते. गाडगीळ यांच्या निवडीवरून पुण्यात पुन्हा एकदा असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीसाठी गाडगीळ यांच्यासह अनेकजण इच्छुक असून त्यावरून पक्षात आताच रणधुमाळी सुरू झाली असल्याचे दिसते आहे. मागील लोकसभा निवडणुकीतील पक्षाचे पराभूत उमेदवार विश्वजीत कदम यांच्या विरोधात मध्यंतरी जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली होती.
आमदार कोट्यातून प्रदेश समितीवर अनंत गाडगीळ यांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 12:02 IST
शहर काँग्रेसकडून डावलण्यात आलेल्या आमदार अनंत गाडगीळ यांनी अखेर आमदार कोट्यातून प्रदेश प्रतिनिधी म्हणून आपली वर्णी लावून घेतली.
आमदार कोट्यातून प्रदेश समितीवर अनंत गाडगीळ यांची वर्णी
ठळक मुद्देथेट दिल्ली कनेक्शन वापरून गाडगीळ यांनी हा ताकदीचा प्रयोग केला असल्याची चर्चा आहे.गाडगीळ यांचे नाव रात्री उशिरा मुंबईत टिळक भवन येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. गाडगीळ यांच्या निवडीवरून पुण्यात पुन्हा एकदा असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे.