आनंद यादव यांना जीवनगौरव पुरस्कार

By Admin | Updated: May 15, 2014 05:26 IST2014-05-15T05:26:04+5:302014-05-15T05:26:04+5:30

धनकवडी युथ फांउडेशन यांच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार, धनकवडी गौरव पुरस्कार, धनकवडी भूषण पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले

Anand Yadav's lifetime achievement award | आनंद यादव यांना जीवनगौरव पुरस्कार

आनंद यादव यांना जीवनगौरव पुरस्कार

पुणे : धनकवडी युथ फांउडेशन यांच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार, धनकवडी गौरव पुरस्कार, धनकवडी भूषण पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. साहित्यिक श्याम भुर्के यांच्या हस्ते पुरस्कार दिले. या वेळी आमदार भीमराव तपकीर, विकास चव्हाण, उमेश पवार आदी उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव, डॉ. वैजयंती पटवर्धन (वैद्यकीय), नरेंद्र डोंगरे (कलावंत) यांना जीवन गौरव पुरस्कार आणि अ‍ॅड. सुभाष मोहिते, नंदकुमार सूर्यवंशी, बजरंग निंबाळकर, पद्मावती सुग्रे, दिलीप जामदार, प्रकाश पवार, ललित खंडाळे, आण्णा तळेकर यांना धनकवडी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तर दिलीप व्यास, सदाशिव कुंदेन, ह.भ.प.पांडुरंग खडके, विश्वास लिंगाडे, वसंत गुजर, रमेश सरोदे यांना धनकवडी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Anand Yadav's lifetime achievement award