शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जंगली महाराज रस्त्यावरील खचलेल्या चेंबरच्या कामाची चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 10:08 IST

नवीन चेंबर बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी पाणी कमी प्रमाणात तुंबले होते.

पुणे : जंगली महाराज रस्त्यावर गेल्या ३० वर्षांत एकदाही खड्डा पडलेला नाही. पण, याच रस्त्यावर पाच वर्षांपूर्वी केलेले चेंबर खचून मोठा खड्डा पडला होता. एवढ्या कमी कालावधीत हा चेंबर खचला कसा, याची चौकशी पथ विभागाकडून केली जाणार आहे.

पुणे शहरात पावसाळ्यात अनेक रस्त्यांना खड्डे पडतात. पण, महापालिकेने सुमारे ३० वर्षांपूर्वी जंगली महाराज रस्त्याचे काम करताना त्याच्या कामाच्या गुणवत्तेकडे तत्कालीन अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्याने या रस्त्याला खड्डे पडत नाहीत. पण, गेल्या काही वर्षांपासून जंगली महाराज रस्त्यावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने येथील पावसाळी गटारांची क्षमता वाढविणे, नवीन चेंबर बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी पाणी कमी प्रमाणात तुंबले होते.छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या समोरच्या बाजूस जंगली महाराज रस्त्यावर पावसाळी गटाराचे चेंबर खचले होते. मनसेचे कार्यकर्ते प्रशांत कनोजिया यांनी यासंदर्भात महापालिकेकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता तेथे मोठे भगदाड पडण्याची शक्यता होती. पण, हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठा अपघात होण्यापासून वाचला आहे.

जंगली महाराज रस्त्यावर हा चेंबर सुमारे ५ वर्षांपूर्वी केलेला आहे. पण, तो एवढ्या लवकर कसा काय खचला, मोठी पोकळी कशी निर्माण झाली, याची चौकशी केली जाईल. संबंधित ठेकेदार आणि अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. - अनिरूध्द पावसकर, पथ विभागप्रमुख, पुणे महापालिका 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcivic issueनागरी समस्याroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक