शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आजाराला कंटाळून वयोवृद्ध महिलेने संपवलं जीवन; बारामतीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 11:41 IST

वयोवृद्ध महिला शुगर व ब्लड प्रेशरच्या आजाराने ग्रासलेल्या होत्या

सांगवी (बारामती): आजाराला कंटाळून एका ७८ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातून समोर आली आहे.

याबाबत मुलगा लक्ष्मण जगन्नाथ कोळेकर (वय ४०) रा. शिंगाडे वस्ती म्हसोबावाडी,मानपावस्ती (ता.बारामती जि. पुणे) यांनी माळेगाव पोलिसांत खबर दिली आहे. पोलीस नाईक विशाल गजरे यांनी दिलेल्या माहिती नुसार चंद्रभागा जगन्नाथ कोळेकर (वय ७८) रा. शिंगाडेवस्ती म्हसोबावाडी, मानापावस्ती (ता. बारामती जि. पुणे) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. 

आत्महत्या केलेल्या वयोवृद्ध महिला शुगर व ब्लड प्रेशरच्या आजाराने ग्रासलेल्या होत्या. या आजारामुळे त्या सतत मानसिक तणावात होत्या. आजाराच्या वेदना असह्य झाल्याने चंद्रभागा कोळेकर यांनी सोमवार (दि.३) रोजी सकाळी साडे सहा वाजण्याच्या पूर्वी राहत्या घरी पत्र्याच्या शेडच्या अँगलला गळफास घेतला. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माळेगाव पोलीस ठाण्याच्या अधिपत्याखालील पाच दिवसांतील ही दुसरी आत्महत्या असून,(२९ सप्टेंबर )रोजी कर्हावागज ,(ता. बारामती) येथील एका अल्पवयीन मुलाने आईने नवीन मोबाईल घेऊन न दिल्याच्या नैराश्यतून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या पाठोपाठ आत्महत्येची ही दुसरी घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीDeathमृत्यूPoliceपोलिसSenior Citizenज्येष्ठ नागरिक