शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'शासन आपल्या दारी' योजनेद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 16:36 IST

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते....

पुणे : 'शासन आपल्या दारी' योजनेमुळे आता सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. सध्या सर्वसामान्यांचे सरकार म्हणून आम्ही काम करत आहोत. यासाठी सर्व विभागातील अधिकारीही मनापासून काम करत आहेत. आता दाखल्यापासून लाभापर्यंत सर्व मिळत आहे. आतापर्यंत दीड कोटी लोकांनी शासन आपल्या दारी योजनेचा फायदा घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्यातील ग्रामपंचायतींनाही सक्षम केले जाईल. जेजुरीसाठी ३५९ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये सर्वांना एका छताखाली आणून त्यांची कामे केली जात आहे. राज्यातील सात ते आठ कोटी नागरिकांना आम्ही योजनेचा लाभ पुरवणार आहे. 

"आम्ही मिळून काम करणार"-

या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुढे जात आहे. राज्यातील बसस्थानके स्वच्छ आणि चांगली होतील यासाठी सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या राज्यात कुठलाही विरोधक खालच्या पातळीवर टीका करतात, त्यांच्याकडे लोकांनी दुर्लक्ष करावे. शेतकऱ्यांना आणि नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही सर्व कामे दोन वर्षांत पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. यापूर्वी चंद्रकांत पाटील काम करत होते. आता मी आणि दिलीप वळसे पाटील आणि चंद्रकांत पाटील मिळून काम करणार आहोत.

हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही-

जे कंत्राटदार चांगले काम करतील त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. पण जे कामात हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हे सरकार पहिले दोन इंजिनच होते, आता त्यात आमचं एक इंजिन जोडलं गेल्याने हे तीन इंजिनच सरकार उत्तम काम करेल, असंही पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJejuriजेजुरी