शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Blast Case Verdict : प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
3
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
4
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
5
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
7
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
8
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
9
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
10
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
11
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
12
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
13
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
14
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
15
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
16
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
17
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
18
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
19
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
20
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट

आम्रपाली चव्हाण यांची जागतिक शांततेसाठी भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 23:39 IST

नऊ वर्षांपूर्वी ( १३ फेब्रुवारी २०१० ) रोजी पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात अनेकांचे बळी गेले.

कामशेत : नऊ वर्षांपूर्वी ( १३ फेब्रुवारी २०१० ) रोजी पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात अनेकांचे बळी गेले. तर या बॉम्बस्फोटातून बचावलेल्या व गंभीररीत्या जखमी झालेल्या एका युवतीने प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या शरीरावरील वेदनांवर विजय मिळवला. आपल्याला भेटलेले ह्या नवीन जीवनाचे सार्थक करण्यासाठी जगाला शांततेचा संदेश देण्याचा मानस केला. आणि फ्लाय फोर पिस म्हणत जगाला शांततेचा संदेश देत कामशेत शहराजवळील डोंगरावरून बुधवार ( दि. १३ ) पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून अवकाशात उतुंग भरारी घेतली.१३ फेब्रुवारी २०१० रोजी पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात बचावलेली आम्रपाली चव्हाण ही युवती जखमी झाली होती. ( आम्रपालीला ६० टक्के अपंगत्व आले होते व ती ५४ टक्के भाजली होती. ) या बॉम्बस्फोटात झालेल्या आघातावर ती सुमारे ६० दिवस आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. यावेळी आम्रपाली वर सुमारे सात मोठ्या शस्त्रक्रिया आणि तीनशे विनाशस्त्रक्रिया व उपचार झाले आहेत. यातून सावरत ती पुन्हा जगण्यास सज्ज झाली. आपल्याला मिळालेले बोनस आयुष्य जगताना जगाला शांततेचा संदेश देण्याचा उद्देश मनाशी बाळगून अम्रापालीने जीवनाची नवीन सुरुवात केली.आपण अपंग असून सुद्धा पॅराग्लायडिंग या साहसी प्रकारातून आकाशात उंच भरारी घेत तिने जगाला शांततेचा संदेश दिला आहे.यावेळी तिला ऑरेंज लाईफ ऍडव्हेंचर चे विजय सोनी, सुभाष शेवाळे, सनी कोळेकर, विकास आंद्रे, सौरव आंद्रे, अविनाश जाधव आदींनी प्रशिक्षण दिले. अम्रापालीच्या गगन भरारीची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड घेणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तर पुढील मोहिमेत तिने माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा संकल्प केला आहे. तर तिचे साहस व जिद्द पाहून प्रोत्साहित झालेल्या ध्रुव सायखेडकर या १३ वर्षाच्या मुलानेही यावेळी साहसी पॅराग्लायडिंग करून तिच्या कार्यात सहभाग घेतला. पॅराग्लायडिंग करणारा ध्रुव सायखेडकर हा सर्वात तरुण मुलगा ठरला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ध्रुव फौंडेशन च्या वतीने करण्यात आले होते. कामशेत जवळील पिंपळोली गावाच्या हद्दीत झालेल्या कार्यक्रमात सुचारिता कनकरत्नम, यशवंत मानखेडकर, सुबोध सायखेडकर, रुपाली सायखेडकर, पिंपळोली गावच्या सरपंच रेश्मा संदीप बोंबले, पोलीस पाटील दिपाली मानकु बोंबले, ताजे गावाचे पोलीस पाटील गंगाराम केदारी, कामशेत पोलीस ठाण्याचे राम कानगुडे, दत्ता शिंदे आदींसह ग्रामस्थ व लहान मुले, मोठ्या संख्येने उपस्थित होते.-------------मी उंच भरारी घेतली आहे, कारण मला आतंकवाद्यांना दाखवून द्यायचं आहे कि आम्ही भारतीय कोणालाही घाबरत नाही. आतंकवादीनी बॉम्बस्फोट करून काय मिळवले, आम्ही भारतीय जगाला शांततेचा संदेश देण्यासाठी आलो आहोत.- आम्रपाली चव्हाण