शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा काय देशाचे मालक नाही; प्रकाश आंबेडकरांचा जोरदार टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 16:08 IST

भलेही त्यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ आली तर हरकत नाही....

पुणे : अमित शहा काय देशाचे मालक नाही, प्रत्येकजण मालक आहे. तुम्ही फक्त खुर्चीवर आहेत. त्यांची चर्चा काय झाली यापेक्षा रश्मी शुक्ला यांचा अहवाल काय आला हे महत्त्वाचे आहे असाही टोला वंचित बहुजन विकास आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. 

पुण्यात डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सरकारच्या कठोर निर्बंधांसह विविध विषयांवर रोखठोक भाष्य केले. आंबेडकर म्हणाले, लॉकडाऊनला आधी आम्ही विरोध केला, भाजप 'कॉपी कॅट' आहे.

पुढे आंबेडकर म्हणाले, इथे अनेक लोकांचे हातावर पोट आहे. या सर्व घटकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे आरोग्यमंत्री कोरोनाची ताकद कमी झाली हे सांगत आहे तर दुसरीकडे लॉकडाऊनसारखे कठोर  निर्णय घेत आहे. मात्र, लोकांनी बगावत करण्याआधी ठाकरे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा.

परमबीर सिंग, आणि इतर प्रकरण दाबण्यासाठी कोविड आणला का?पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींचा मास्क न घालता फोटो आहे.सरकार लॉकडाऊ बाबत वंचितसोबत बोललेले नाही, बाकीच्यांशी काय बोलले माहिती नाही.

दुकानदार ऐकण्याच्या स्थितीत नाहीत.त्यांनी दुकान उघडलं तर आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत. भले त्यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ आली तर हरकत नाही अशा शब्दात आंबेडकरांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAmit Shahअमित शहाPoliticsराजकारण