शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमित भारद्वाजचे राज कुद्रांशी संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 14:12 IST

बिटकॉइन संदर्भातील कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या अमित भारद्वाज आणि उद्योगपती राज कुंद्रा यांचे संबंध असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

ठळक मुद्देबिटकॉईनच्या फसवणूक चौकशीत उघडपुणे पोलिसांकडे तब्बल २०५ तक्रार अर्ज, यामध्ये १७ कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचे नमूद

पुणे : बिटकॉईनच्या माध्यमातून मोठा परतावा देण्याच्या अमिषाने हजारो लोकांची कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या अमित भारद्वाज आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्याशी संबंध असल्याचे काही पुरावे पुणे सायबर सेलच्या हाती लागले असून त्या आधारे सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी चौकशी केली आहे़ याप्रकरणात ईडीप्रमाणे पुणे सायबर शाखेकडून राज कुंद्रा यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.  या प्रकरणातील मुख्य सुत्रधार अमित भारद्वाज, पंकज अदलखा आणि हेमंत भोपे यांच्यासह काही जणांवर पुण्यातील दत्तवाडी व निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर त्यांच्याविरोधात पुणे नांदेडसह ठाणे, चंदीगड, गुरगाव, कोलकात्ता येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता ते कोलकाता पोलिसांच्या ताब्यात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.    पुण्यातील दत्तवाडी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर निगडी पोलिसांत गुन्हा दाखल केल्यावर भारद्वाज बंधुंना सायबर गुन्हे शाखेने दिल्ली विमानतळावर अटक केली होती. पुण्यातील पोलीस कोठडीची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना नांदेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. यातील मुख्य आरोपी अमित भारव्दाज, पंकज अदलखा आणि हेमंत भोपे यांचा ताबा कोलकाता पोलिसांकडे तपासासाठी देण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुणे सायबर गुन्हे शाखा आणि ईडी यांचा समांतर तपास सुरू आहे. पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अमित भारतद्वाजच्या आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्यासोबत काही संबंध असल्याचा पुरावे मिळाले आहेत. तसेच अटक आरोपींकडे सक्तसुवली संचलनालय (ईडी)च्या पथकाने चार दिवस कसून तपास केला. त्यानंतर उद्योगपती कुंद्रा यांचा भारव्दाज याच्या कंपनीशी काही संबंध आहे का याचाही तपास केला जात आहे. त्यांना यासाठी पुण्यात चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. मात्र, त्यांच्यामध्ये बिटकॉईन संदर्भात काय व्यवहार झाला आहे, हे उघड करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला़.पुणे सायबर क्राईम सेलकडून बिटकॉईनचा तपास सुरु असताना ईडीबरोबर मिळालेल्या माहितीची देवाण घेवाण केली असून त्यातूनच ईडी अधिक चौकशी करीत आहोत़ त्यांच्या चौकशीनंतर गरज वाटली तर आम्ही राज कुंद्रा यांच्याकडे चौकशी करणार आहोत. सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा

......................

पुणे सायबर सेलकडे २०५ तक्रारअर्जया प्रकरणात पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह दिल्ली आणि मध्यप्रदेशमधील इंदौर येथील तब्बल २०५ तक्रार अर्ज पुणे पोलिसांकडे आले आहेत. यामध्ये १७ कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचे नमूद केले आहे़. 

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमBitcoinबिटकॉइनPoliceपोलिसfraudधोकेबाजी