मतदारांना पैशाचे अमिष ?

By Admin | Updated: February 21, 2017 02:12 IST2017-02-21T02:12:17+5:302017-02-21T02:12:17+5:30

तालुक्यातील जिल्हा परिषद सुपा मेडद गटातील कारखेल गावात मतदारांना पैसे वाटप करीत असा संशय आल्याने भाजपा कार्यकत्यार्नी

Amish to the voters? | मतदारांना पैशाचे अमिष ?

मतदारांना पैशाचे अमिष ?

बारामती : तालुक्यातील जिल्हा परिषद सुपा मेडद गटातील कारखेल गावात मतदारांना पैसे वाटप करीत असा संशय आल्याने भाजपा कार्यकत्यार्नी गाडी अडवून फोडली. या गाडीत ५० हजार रुपयांची रोकड सापडली. उर्वरित रक्कम गाडीतील कार्यकर्ते बरोबर घेऊन पळाले. भरारी पथक उशीरा घटनास्थळी पोहचले. मात्र संतप्त भाजप कार्यकत्यार्नी कार फोडली.
सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांनी गाडी पकडली. यावेळी गाडीतील तरुणांनी रोकड घेऊन धूम ठोकली. मात्र ५० हजार गाडीत मिळाले. भरारी पथक जवळपास ९.३० वाजता पोहचले. त्यामुळे देखील तणाव वाढला. दरम्यान रात्री १० च्या सुमारास सुपे येथे देखील याच प्रकारे पैसे  घेऊन आलेली पकडल्याचे वृत्त आहे. यांबाबत देखील भरारी पथक आणि पोलिसांना कळवले.

Web Title: Amish to the voters?