शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा रुग्णवाहिकेचा 'ढिम्म' कारभार चव्हाट्यावर ; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 12:24 IST

रुग्णवाहिका चालकांनी असमर्थता दर्शवल्यामुळे मृतदेह होता चार तास रस्त्यावर पडून

ठळक मुद्देतब्बल सात तासानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार

पुणे (धनकवडी): नेहमी रुग्णांना जीवदान देण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावते ती म्हणजे रुग्णवाहिका. संपर्क केल्यानंतर काही क्षणात घटनास्थळी दाखल होत रुग्णांना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत असते. मात्र, कोरोना काळात रूग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या. यामुळे या यंत्रणेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. असाच एक प्रसंग काल पुुुण्यात घडला.

रुग्णवाहिका न मिळाल्याने चार तास रस्त्याच्या कडेला एक मृतदेह पडून राहिल्याची दुर्दैवी घटना बिबवेवाडी येथील इंदिरानगर लोअर येथे मंगळवारी घडली. खिशात सापडलेल्या डायरीवरून किसन मारुती केदार, (वय ६०) असे त्या मृत व्यक्तीचे नाव असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. केदार हे मंगळवारी सकाळी अकरा वाजता इंदिरानगर येथील पदपथावरून चालत निघाले असता ते चक्कर येवून पडले. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील हवालदार विश्वनाथ शिंदे हे घटनास्थळी आले. त्यांनी बरेच ठिकाणी फोन करून शेवटी १०८ रूग्णवाहिकेला बोलवले. तासाभराच्या प्रतीक्षेनंतर १०८ रूग्णवाहिका आली तोपर्यंत ती व्यक्ती मृत झाल्याचे तपासणीअंती निदर्शनास आले. रुग्णवाहिकेेने मृतदेह नेण्यासाठी १०८ मधील कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शवली. त्यांनी १०२ नंबरवर संपर्क करण्यास सांगितले. १०२ या नंबर सह पोहिस हवालदार शिंदे यांनी अनेक ठिकाणी पुन्हा प्रयत्न सुरू केले. तब्बल चार तासांनी महापालिकेने पाठवलेली रूग्णवाहिका आली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. परंतू या घटनेमुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे समोर आले आहे. गेल्याच आठवड्यात धनकवडी परिसरात घरी मृत्यू झालेल्या दोन कोरोनाबाधीतांचे अंत्यसंस्कार स्वतः सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख आणि आरोग्य कर्मचार्यांना करावे लागले होते. चव्हाणनगर येथील कोरोनाबाधित ६५ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. मृत घोषित करणारी यंत्रणा, मृत्यूचा दाखला देणारी व्यवस्था आणि पोलिस पंचनामा या बाबी सहाय्यक आयुक्त देशमुख यांना कराव्या लागल्या आणि तब्बल सात तासानंतर त्या वृध्देचा अंत्यसंस्कार पार पडला. --------------------------------------------

टॅग्स :BibvewadiबिबवेवाडीDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या