शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आंबिलओढा पूरग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 12:45 IST

गेल्या महिन्यात २५ सप्टेंबरला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिलओढ्याला पूर आला. त्यामुळे काठच्या वसाहती आणि अपार्टमेंटमध्ये पाणी घुसले...

ठळक मुद्देमदतनिधी देण्याची मागणी : धोकादायक घरातून नागरिकांचे पुनर्वसन करा 

पुणे : सप्टेंबर महिन्यात आंबिलओढ्याला आलेल्या पुरात घराचे आणि संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झालेल्यांना तातडीने २० हजारांची मदत द्यावी, तीन महिन्यांचा शिधा द्यावा, घराची आणि पाण्याच्या नळांची डागडुजी करून द्यावी, या मागण्यांसाठी दांडेकर पूल वसाहत परिसरातील पूरग्रस्तांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. गेल्या महिन्यात २५ सप्टेंबरला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिलओढ्याला पूर आला. त्यामुळे काठच्या वसाहती आणि अपार्टमेंटमध्ये पाणी घुसले. त्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पर्वती पायथ्यापासून खालील भागातील अंदाजे तीनशे ते साडेतीनशे घरांचे नुकसान झाले असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या पुरामुळे घरांची पडझड झाली, काही घरांच्या भिंतीला तडे गेले. घरातील जीवनावश्यक साहित्य आणि शालेय वस्तूंचे नुकसान झाले. सायकल, मोटारसायकल, रिक्षा, हातगाडी, टपरी, किराणा दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत द्यावी, या मागणीसाठी आंबिलओढा परिसर पूरग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. डॉ. निखिल एडके, रवी पुर्णे, हनुमंत फडके, आलम शेख, वंदना मोरे, लता आईवळे, मुक्ता माने यांच्यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते. डॉ. एडके म्हणाले, की पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून वीस हजार रुपयांची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे  तीन दिवसांत ५ हजार रुपयांची तातडीची मदत देण्याचे आश्वासन  देण्यात आले. ओढ्याला लागून असलेली अनेक घरे धोकादायक झाली आहेत. या घरांची दुरुस्ती होईपर्यंत त्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन केले पाहिजे. घरांची डागडुजी, नळदुरुस्ती आणि विद्युत मीटरची दुरुस्ती सरकारने करून दिली पाहिजे. परिसरात डेंग्यूचे ९ रुग्ण आढळले आहेत. त्यावरही तातडीने उपाययोजना कराव्यात.  

टॅग्स :PuneपुणेfloodपूरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका