आंबेगाव राष्ट्रवादीच्या ताब्यात
By Admin | Updated: February 24, 2017 02:12 IST2017-02-24T02:12:02+5:302017-02-24T02:12:02+5:30
आंबेगाव तालुका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले असून, पंचायत

आंबेगाव राष्ट्रवादीच्या ताब्यात
नीलेश काण्णव/ घोडेगाव
आंबेगाव तालुका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले असून, पंचायत समितीमध्ये १०पैकी राष्ट्रवादीला ६ जागा, ३ जागा शिवसेना तर १ जागा अपक्ष निवडून आला आहे. जिल्हा परिषदेमध्ये ५ पैकी ४ राष्ट्रवादी काँग्रेस, तर १ शिवसेनेकडे गेली
आहे. पंचायत समिती सभापतिपद हे ओबीसी महिलासाठी आरक्षित असून, या जागेवर राष्ट्रवादी काँगे्रसच्या कळंब गणातून एकमेव उषा रमेश कानडे या निवडून आल्या असल्याने त्यांना संधी मिळू शकणार आहे.
जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीने अघाडी घेतली असली तरी आमोंडी/शिनोली या हक्काच्या गटात शिनोली गणात निसटता विजय मिळविला.
पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक/अवसरी बुद्रुक गटातील अवसरी बुद्रुक गटात पराभव झाला. या हक्काच्या भागात राष्ट्रवादीला अपयश आले. तर घोडेगाव/पेठ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला गट शिवसेनेला ताब्यात ठेवण्यात यश आले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेत गेल्यापासून हा गट त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे.
या गटात त्यांचे स्वत: लांडेवाडी हे गाव व त्यांचा प्रभाव असणारी इतर गावे आहेत. मंचर गणात शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बाजूला ठेवत मतदारांनी राजाराम बाणखेले या अपक्ष उमेदवाराला विजयी केले. दोन्ही नेत्यांना येथील मतदारांनी धक्का दिला.
तालुक्याच्या पाच गटांतील आमोंडी/शिनोली गटात रूपा
जगदाळे यांना विक्रमी अशा ४९४७
फरकाने मतदारांनी निवडून दिले. घोडेगाव/पेठ गटात देविदास दरेकर हे अवघ्या ३५७ मतांच्या फरकाने निवडून आले.
तसेच कळंब/चांडोली बुद्रुक गटात तुलसी भोर या १००८ मतांच्या फरकाने तर मंचर/अवसरी खुर्द गटातील अरुणा थोरात या २३०३ मतांच्या फरकाने निवडून आल्या. तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक/अवसरी बुद्रुक गटात विवेक वळसे पाटील हे अरुण गिरे यांच्यापेक्षा १५९१ मतांच्या फरकाने निवडून आले.
दहा पंचायत समिती गणातील पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक गणातून
संजय गवारी हे विक्रमी अशा २७०८ मतांनी निवडून आले, तर अवसरी खुर्द
गणात संतोष भोर हे २०३७ मतांनी, कळंब गणात उषा कानडे या १९२४ मतांनी
निवडून आल्या, तर पेठ गणात
शीतल तोडकर या १७०० मतांनी निवडून आल्या. (वार्ताहर)