आंबेडकरांची स्मृतिस्थळे जतन करणार
By Admin | Updated: April 6, 2016 01:14 IST2016-04-06T01:14:24+5:302016-04-06T01:14:24+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यातील सर्व स्मृतिस्थळे राज्य शासन जतन करेल, त्यासाठी येणारा निधी उपलब्ध करून देण्यास शासन कर्तव्यबद्ध राहील.

आंबेडकरांची स्मृतिस्थळे जतन करणार
चिंचवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यातील सर्व स्मृतिस्थळे राज्य शासन जतन करेल, त्यासाठी येणारा निधी उपलब्ध करून देण्यास शासन कर्तव्यबद्ध राहील, असे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात ‘धम्मभूमी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, प्रा. शुक्राचार्य गायकवाड, प्रा. धर्मराज निमसरकर, मानव कांबळे, शरद जाधव, स्वप्निल रोकडे, प्रकाशक विजय जगताप, लेखक प्रभाकर ओव्हाळ, संयोजक सुनील चाबुकस्वार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
बडोले म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९५४ रोजी देहूरोड येथे स्वहस्ते बुद्धमूर्ती स्थापित केली होती. धर्मांतरापूर्वी केलेले ते धर्मांतर होते. समता आणि बंधूतेच्या विचारांची केंद्रे बुद्धविहार बनली पाहिजेत.’’
आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, लेखक प्रभाकर ओव्हाळ, प्रा. शुक्राचार्य गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी बाबासाहेबांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात राहिलेल्या काशीबाई गायकवाड, शाहीर राजाराम वाघमारे, रोहिणी वडके, तसेच आंबेडकरी चळवळीतील सत्यवान मोरे, विनायक रोकडे, नाना गायकवाड, राजरत्न शिलवंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
विजय जगताप यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी शिंदे यांनी सूत्रसंचालन तर सुनील चाबुकस्वार यांनी आभार मानले. (वार्ताहर)