शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

By admin | Updated: April 16, 2015 01:06 IST

सारनाथ बुद्ध विहारमध्ये नगरसेवक विवेक यादव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडक र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पुणे : सारनाथ बुद्ध विहारमध्ये नगरसेवक विवेक यादव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडक र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विहाराचे अध्यक्ष वसंत कांबळे, उपाध्यक्ष शशिकला कांबळे, विजय गायकवाड उपस्थित होते.मातोश्री रमाई प्रतिष्ठानच्यावतीने मोरे विद्यालय येथील निळा झेंडा चौकात आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. यावेळी नगरसेवक दीपक मानकर, आरपीआय अध्यक्ष महेंद्र कांबळे, महेश शिंदे, पद्मा शिरसाठ, विलास शिरसाठ, सुनिल वडवेराव, बाबा घोंगडे, संतोष कांबळे उपस्थित होते.डायस प्लॉट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर दवाखान्यामध्ये मॅटर्निटी होम, ओपीडी तसेच डेंटल मशीनचे राज्यमंत्री समाजकल्याण व न्यायमूर्ती दिलीप कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक डॉ. भरत वैरागे, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, जयप्रकाश पुरोहित, संतोष इंदुरकर, नगरसेविका कविता वैरागे उपस्थित होते. राज्याभिषेक फाऊंडेशनच्यावतीने मुंढवा येथील लोणकर विद्यालय येथे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष प्रमोद जाधव, माजी उपमहापौर सुनिल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जानमहम्मद पठाण, उपपोलीस निरिक्षक कोपरे व सुरेखा घाडगे उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने हडपसर परिसरातील अंध, अपंग, मूक-बधिर मुलांना अन्नदान नेते गंगाधर यादव यांच्या वतीने देण्यात आले.(प्रतिनिधी)४सुयोगनगर येथे बुद्धविहाराचे भूमिपूजन सरपंच संजीवनी वाघमारे, दगडखाण कामगार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बी.एम.रेगे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर काटके, अध्यक्ष सर्जेराव वाघमारे उपस्थित होते.४सर परशुरामभाऊ महाविद्यालयच्यावतीने डॉ. जया जगताप यांच्या आम्ही सूर्याच्या मायलेकी या महाराष्ट्रातील दलित कवियित्रींच्या मुलाखती व संशोधन प्रकल्पावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.संविधानाच्या प्रतींचे वाटप४ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पुणे स्टेशन परिसरातील बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यास जमलेल्या मान्यवरांना महापालिकेकडून या वर्षी राज्यघटनेच्या संविधानाच्या प्रतींचे वाटप करून अनोखा आदर्श घालून देण्यात आला. यावेळी महापालिकेकडून तब्बल ५०० प्रतींचे वाटप पालकंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सह महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, क्षेत्रीय अधिकारी संदीप ढोले पाटील, स्थानिक नगरसेवक अजय तायडे यावेळी उपस्थित होते.४ स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळयाच्या परिसरात १४ एप्रिलला मोठया प्रमाणात जनसागर लोटतो. या वेळी येणा-या राजकीय पक्ष, संस्था, संघटना तसेच विशेष मान्यवरांचा महापालिकेकडून दरवर्षी निळे उपरणे आणि स्मृती चिन्ह देण्यात येते. ४मात्र, हे न देता, येणा-या मान्यवरांना संविधानाची प्रत देऊन नवा आदर्श घालून द्यावा अशी मागणी मनसेचे नगरसेवक अजय तायडे यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार, आंबेडकर जयंती निमित्ताने या वर्षीपासून राज्यघटनेची प्रत महापालिकेकडून देण्यास सुरूवात करण्यात आली आहे.