शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ दुर्घटनेत पुण्यातील महिलेचा मृत्यू; १५ मिनिटांपूर्वीच झाले होते व्हिडिओ कॉलवर बोलणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 19:39 IST

ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली...

धायरी: अमरनाथ येथील ढगफुटीत धायरी येथील सुनीता भोसले (वय अंदाजे: ५५, फॉर्चूना सोसायटी, धायरी) या भाविक महिलेचा मृत्यू झाला आहे. दरड कोसळताना काही दगड डोक्यावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमरनाथ यात्रेला ३० जूनला सुरुवात झाली आहे. या अमरनाथ यात्रेसाठी पुण्यातून काही भाविक गेले आहेत. आळंदी येथील गजानन महाराज सोनुने यांच्या बरोबर एका बसमधून ५० भाविक यात्रेसाठी गेले होते. यामध्ये पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील महेश राजाराम भोसले, सुनीता महेश भोसले हे पती-पत्नी आणि महेश भोसले यांची बहीण प्रमिला प्रकाश शिंदे हे यात्रेसाठी गेले होते. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचे दर्शन झाले. दरम्यान अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याने त्यात दरड कोसळून सुनिता भोसले यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला असून महेश भोसले व प्रमिला शिंदे या दुर्घटनेतून बचावले आहेत. 

१५ मिनिटांपूर्वी व्हिडिओ कॉलवर झाले होते बोलणे...ही दुर्घटना घडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी यात्रेत गेलेल्या सुनिता भोसले यांनी  आपल्या मुलाशी व्हिडीओ कॉलवर बोलल्या होत्या. फोनवर बोलल्यानंतर  काही वेळात आई आपल्यात नसल्याची माहिती वडिलांनी फोनवरून मुलाला दिली. या ह्दयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी वडगाव बुद्रुक येथील भोसले कुटुंबियांच्या घरी भेट देऊन यासंदर्भात तातडीने आरडीसीबरोबर संपर्क साधत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. 

टॅग्स :PuneपुणेAmarnath Yatraअमरनाथ यात्रा