लोणी काळभोर सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी अमर काळभोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:10 IST2021-07-17T04:10:11+5:302021-07-17T04:10:11+5:30

संस्थेचे मावळते अध्यक्ष धोंडिबा काळभोर व उपाध्यक्ष राजेंद्र केसकर यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी ...

Amar Kalbhor as the President of Loni Kalbhor Co-operative Society | लोणी काळभोर सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी अमर काळभोर

लोणी काळभोर सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी अमर काळभोर

संस्थेचे मावळते अध्यक्ष धोंडिबा काळभोर व उपाध्यक्ष राजेंद्र केसकर यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजयसिंह माळवदकर यांनी काम पाहिले.

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शिवसेनेचे हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी सरपंच शरद काळभोर, कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, नंदू काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर, शिवसेनेचे जिल्हा संघटक रमेश भोसले, माजी पंचायत समिती सदस्या रत्‍ना भोसले, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर काळभोर, माजी उपसरपंच इंद्रभूज काळभोर, युवा नेते कमलेश काळभोर व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक : १६ लोणी काळभोर

फोटो - नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार प्रशांत काळभोर यांच्या हस्ते करण्यात आला.

160721\16pun_2_16072021_6.jpg

फोटो क्रमांक : १६ लोणी काळभोर फोटो - नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार प्रशांत काळभोर यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: Amar Kalbhor as the President of Loni Kalbhor Co-operative Society