शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नवाढीसाठी ‘पीएमपी’च्या वाहक-चालकांना भत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 19:55 IST

‘पीएमपी’च्या उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न आणणाऱ्या चालक व वाहकांना प्रत्येकी १० टक्के भत्ता देण्याचा निर्णय

ठळक मुद्देउत्पन्नवाढीसाठी पीएमपीकडून विविध उपाययोजनाप्रोत्साहन भत्त्यासाठी उत्पन्नाचे उद्दिष्ट निश्चित

पुणे : कमी झालेले उत्पन्न वाढविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)कडून चालक व वाहकांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. याची सुरूवात प्रायोगिक तत्वावर ९४  मार्गांवर केली जाणार आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न आणणाऱ्या चालक व वाहकांना प्रत्येकी १० टक्के भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मागील काही महिन्यांत ‘पीएमपी’च्या उत्पन्नांमध्ये घट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित वेळेत करणेही शक्य होत नाही. या अनुषंगाने उत्पन्नवाढीसाठी पीएमपीकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाहक व चालकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सुरूवात शुक्रवार (दि. १५) पासून केली जाणार आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर तीन कॉरिडॉरमधील ९४ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. कात्रज ते पुणे स्टेशन, कात्रज ते शिवाजीनगर व स्वारगेट ते धायरी या तीन कॉरिडॉरची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक कॉरिडॉरमध्ये अनुक्रमे १९, ६४ व ११ असे मार्ग आहेत. तीनही कॉरिडॉरमध्ये प्रवाशांचा प्रतिसाद खुप चांगला मिळतो. हे मार्ग चांगले उत्पन्न मिळवून देणारे आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पीएमपीने या तीन कॉरिडॉरची निवड केली आहे. प्रोत्साहन भत्त्यासाठी उत्पन्नाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सध्या उत्पन्न व प्रवासी संख्या या तुलनेत हे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न मिळविणारे चालक व वाहक यांना प्रत्येकी १० टक्के प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. तसेच अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी बस संचनलाचे नियोजन केले जाणार आहे. या योजनेला मिळालेल्या प्रतिसादानंतर अन्य मार्गांसाठीही ही योजना सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रवाशांना वेळेत सुलभ बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी आणखी उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. ------------------------कॉरिडॉर                                         मार्ग संख्याकात्रज ते पुणे स्टेशन                       १९कात्रज ते शिवाजीनगर                    ६४स्वारगेट ते धायरी                           ११एकुण                                             ९४----------------------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे