शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांपुढील पुणेकरांच्या लसीकरणाला सरसकट परवानगी द्या: भाजप खासदार गिरीश बापटांचे मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 12:42 IST

वाढत्या रुग्णसंख्येमुळे तात्काळ कार्यवाही करावी..

पुणे: तीस वर्ष वयाच्या पुढच्या पुणेकरांचे सरसकट लसीकरण करायला परवानगी द्यावी अशी मागणी पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे यावर तातडीने कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. ११ फेब्रुवारी ला असणारी साडेचार हजार रुग्णांची संख्या महिनाभरातच  जवळपास २१,७७८ वर पोहोचली आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी अशी मागणी गेले काही दिवस सातत्याने केली जात आहे. साधारण पंधरा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केंद्राकडे सरसकट लसीकरणाची तसेच पुण्याला पुरवल्या जाणाऱ्या रस्त्यांची संख्या वाढवण्याची मागणी करण्याचा निर्णय झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर खासदार बापट यांनी हे पत्र लिहिले आहे. 

पुणे शिक्षणाचे माहेरघर आहे मात्र याच शहरात शाळा कॉलेज सुरू करून बंद करावे लागले. त्यामुळे लाखो तरुण मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे तसेच निर्बंधांमुळे आर्थिक उलाढालीवर देखील परिणाम होत आहे. आत्ताच्या लसीकरणाचा वेग पाहता वर्षभरात लसीकरण होणार नाही. हे लक्षात घेता पुणे शहराला जास्त लसी पुरवून तीस वर्षाच्या वरच्या सर्व नागरिकांचे लसीकरण करावे असे बापट यांनी या पत्रात म्हटले आहे. सिरम चा कोविशिल्ड बनवणारा प्लांट पुण्यात आहे. त्याचाही फायदा शहराला घेता यावा असेही या पत्रात म्हटलेले आहे. तसेच यातून हे शहर पहिले कोरोना मुक्त शहर होऊ शकेल असाही दावा बापट यांनी केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याgirish bapatगिरीष बापटNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा