आळेफाटा पोलिसांचे राजुरी, बेल्हा येथे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:11 IST2021-09-18T04:11:51+5:302021-09-18T04:11:51+5:30

गणेशोत्सव सध्या सर्वत्र उत्साहात सुरू आहे. हा उत्सव शांततेत पार पडावा आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या ...

Alleppey police patrol at Rajuri, Belha | आळेफाटा पोलिसांचे राजुरी, बेल्हा येथे पथसंचलन

आळेफाटा पोलिसांचे राजुरी, बेल्हा येथे पथसंचलन

गणेशोत्सव सध्या सर्वत्र उत्साहात सुरू आहे. हा उत्सव शांततेत पार पडावा आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी राजुरी व बेल्हा येथे पथसंचलन करण्यात आले. यामध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, रघुनाथ शिंदे व रागिनी कराळे यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते.

दरम्यान, गणेशोत्सव काळात शांतता राहावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या आदेशान्वये १४ जणांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच ठाण्याअंतर्गत गुन्हेगारी कृत्य नोंद असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, अवैध दारूविक्री करणारे यांच्यावरही कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेले नियमांचे पालन करीत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी केले आहे.

170921\img-20210917-wa0235.jpg

??????? ????????? ?????? ???? ???????

Web Title: Alleppey police patrol at Rajuri, Belha