संभाजी ब्रिगेड लढणार सर्व जागा

By Admin | Updated: January 9, 2017 02:47 IST2017-01-09T02:47:03+5:302017-01-09T02:47:03+5:30

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत संभाजी ब्रिगेड सर्व जागा लढविणार असल्याची माहिती, प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिली.

All the seats that Sambhaji Brigade will fight | संभाजी ब्रिगेड लढणार सर्व जागा

संभाजी ब्रिगेड लढणार सर्व जागा

पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत संभाजी ब्रिगेड सर्व जागा लढविणार असल्याची माहिती, प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिली.
संभाजी ब्रिगेडने महिनाभरापुर्वीच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबतची घोषणा केली. यानुसार महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढविल्या जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणुक लढविण्यासाठीही ब्रिगेडने तयारी सुरु केली आहे. ३२ प्रभागातील १२८ जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत. उमेदवारी मागणी अर्ज मागवून मुलाखती घेतल्यानंतर उमेदवारी देण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे आखरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अभिमन्यू पवार, सचिव प्रवीण कदम, उपाध्यक्ष सुनील साळुंके, गुरुदास देसाई, सुहास जगदाळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: All the seats that Sambhaji Brigade will fight