सर्वच परिमंडळ कार्यालये एफडीओच्या रडारवर
By Admin | Updated: August 22, 2014 00:21 IST2014-08-22T00:21:10+5:302014-08-22T00:21:10+5:30
अन्न पुरवठा विभागाने एजंटगिरीला अटकाव आणण्यासाठी कंबर कसली असून, पोलिसांच्या मदतीने शहर, पिंपरी-चिंचवडमधील सर्वच कार्यालयांतून एजंटांना हद्दपार करण्यात येणार आहे.

सर्वच परिमंडळ कार्यालये एफडीओच्या रडारवर
पुणो : अन्न पुरवठा विभागाने एजंटगिरीला अटकाव आणण्यासाठी कंबर कसली असून, पोलिसांच्या मदतीने शहर, पिंपरी-चिंचवडमधील सर्वच कार्यालयांतून एजंटांना हद्दपार करण्यात येणार आहे. सर्व परिमंडळ अधिका:यांना संबंधित पोलीस ठाण्यात त्याबाबत पत्र देण्याचे आदेश शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी (एफडीओ) धनाजी पाटील यांनी दिले आहेत.
शिवाजीनगर गोदामात रानू रमेश मिश्र (वय 45 रा. येरवडा) या महिला एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.19) दोन हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. या कारवाईच्या दुस:या दिवशीदेखील येथे एजंटगिरी सुरूच असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले होते. त्या पाश्र्वभूमीवर एफडीओ कार्यालयाने एजंटगिरीला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.
शिवाजीनगर येथील गोदामात अन्नधान्य पुरवठा विभागाची ड, ब, क, फ अशी चार परिमंडळ कार्यालये आहेत. या कार्यालयांतून कोथरूड, शिवाजीनगर, उत्तमनगर, सांगवी, पाषाण, औंध, कसबा पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ अशा जवळपास निम्म्या शहरातील शिधापत्रिका व अन्नधान्य
पुरवठय़ाचे काम चालते. येरवडय़ात ई, अंबिलओढा ह, निगडी अ व मंडई येथे ग अशी अन्य चार परिमंडळ कार्यालये आहेत. येथून उर्वरित पुणो व
पिंपरी-चिंचवडचा कारभार
चालतो.
नवीन शिधापत्रिका काढणो, जुनी शिधापत्रिका बदलून घेणो, शिधापत्रिकेत नवीन नाव अंतभरूत करणो अथवा नाव कमी करण्याचे काम केले जाते.
त्यासाठी नेहमीच परिमंडळ कार्यालयात नागरिकांची गर्दी असते. कमी दिवसांत काम करून देण्याचे आमिष दाखवून अव्वाच्या सव्वा रक्कम नागरिकांकडून उकळली जाते. याविषयी माहिती देताना अन्नधान्य पुरवठा अधिकारी धनाजी पाटील म्हणाले, की शहरातील आठ परिमंडळ कार्यालय, सेंट्रल बिल्डिंगमधील एफडीओ कार्यालय, धान्य गोदामात मिळून 56 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
यासाठी 12 लाख 6क् हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाची ई-निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. (प्रतिनिधी)
प्रत्येक परिमंडळ अधिका:याला संबंधित पोलीस ठाण्याला एजंटगिरीला आळा घालण्यासाठी मदत करण्याचे पत्र पाठविण्याची सूचना केली आहे. सर्वच परिमंडळ कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा प्रस्ताव असून, त्याचे ई-टेंडरिंग काढण्यात येणार आहे.
- धनाजी पाटील, अन्नधान्य पुरवठा अधिकारी