गडकरी यांच्या पुतळ्यासाठी सर्वपक्षीयांनी पुढाकार घ्यावा
By Admin | Updated: April 24, 2017 05:11 IST2017-04-24T05:11:18+5:302017-04-24T05:11:18+5:30
संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा सन्मानाने बसविण्यासाठी महापौर व सभागृह नेत्यांनी पुढाकार घ्यावा

गडकरी यांच्या पुतळ्यासाठी सर्वपक्षीयांनी पुढाकार घ्यावा
पुणे : संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा सन्मानाने बसविण्यासाठी महापौर व सभागृह नेत्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच ही जबाबदारी महापालिकेतील सर्व नेत्यांची आहे, असे सांगत आमदार मेधा कुलकर्णी यांनी गडकरी यांच्यासह छत्रपती संभाजीमहाराजांचा पुतळाही सन्मानाने बसविण्यासाठी मीही प्रयत्न करीन, असे स्पष्ट केले.
कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, ‘‘संभाजी उद्यानातून एका रात्रीत गडकरी यांचा पुतळा हटविण्यात आला. हा त्यांचा मोठा अपमान असून तो भरून काढायचा असल्यास पुतळा पुन्हा सन्मानाने बसवायला हवा.’’
पुतळा बसविण्यासाठी त्या वेळी पालिकेतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शविला. त्यामुळे या
सर्वांनी पुतळा बसविण्यासाठी
पुढाकार घ्यायला हवा. महापौर आणि सभागृह नेत्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गडकरी यांच्याप्रमाणेच संभाजीमहाराजांचा पुतळा बसविण्यासाठी मीही स्वत: प्रयत्न करणार आहे, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)