शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयांचे अंतरिम मनाईचे सर्व आदेश ३० एप्रिल पर्यंत कायम राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 13:20 IST

लॉकडाऊन कालावधीत संपुष्टात येत असतील तर अशा सर्व अंतरीम आदेशांना ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ

ठळक मुद्दे ई-फायलिंग व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा पण उपलब्ध तातडीच्या कोणत्याही प्रकरणात उच्च न्यायालयाकडून योग्य तो आदेश घेण्याचा हक्क संबंधितांना

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाबरोबर औरंगाबाद, नागपूर व पणजी खंडपीठासह त्यांना  सर्व न्यायालये, ट्रिब्युनल, व अर्ध न्यायिक अस्थापनांनी जर काही अंतरिम आदेश दिले असतील व असे आदेश सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत संपुष्टात येत असतील तर अशा सर्व अंतरिम आदेशांना ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (२६ मार्च ) एका रीट याचिकेत दिलेल्या निकालाद्वारे आदेशित केले आहे. त्यात अंतरिम मनाईचे सर्व आदेश ३० एप्रिल पर्यंत कायम राहणार आहेत. असे म्हटले आहे. कोरोनामुळे उच्च  न्यायालयाने यापूर्वी कामकाज केवळ अतितातडीच्या याचिकांपुरते सीमित करून कामकाजासाठीचे दिवस मर्यादित केले होते. तसेच ई-फायलिंग व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा पण उपलब्ध आहे. मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, न्या. ए. ए. सईद, न्या. एस. एस. शिंदे व न्या. के. के. तातेड यांच्या खंडपीठाने हे आदेश आज दिले. या आदेशामध्ये असेही नमूद केले आहे की जर कोणत्याही न्यायालय किंवा अधिकारिणीने कोणत्याही व्यक्तीस ताबा सोडण्याचा आदेश केला असेल किंवा दरखास्तीमध्ये ताबा काढून घेण्याची कारवाई सुरू असेल तर त्याद्वारे ३० एप्रिल पर्यंत कोणालाही त्याच्या ताब्यातील जागेतून बेदखल करू नये. त्याचप्रमाणे महापालिका, नगरपालिका व इतर कार्यालयांनांही आदेशित करण्यात आले आहे की  घरपाडी किंवा इतर कोणत्याही प्रकारे इमारती किंवा त्याचा कोणताही भाग या कालावधी मध्ये पाडू नये जेणेकरुन तेथील रहिवासी बेघर होतील. 

अर्थात अतितातडीच्या कोणत्याही प्रकरणात उच्च न्यायालयाकडून योग्य तो आदेश घेण्याचा हक्क संबंधितांना असेल. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या विद्यमान नियमानुसार पक्षकारांना प्रतिज्ञापत्र करणे किंवा समक्ष हजर राहण्यापासून सूट मिळावी या साठी उच्च न्यायालयातील पाच ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. जनक द्वारकादास, अ‍ॅड.रजनी अय्यर, अ‍ॅड. अनिल अंतुरकर, अ‍ॅड. मिहीर देसाई व अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहून ही मागणी केली होती. .......................पक्षकारांसाठी त्यांना मिळालेला अंतरीम आदेश ही फार महत्वाची बाब असते. ज्याला 'स्टे ऑर्डर' म्हणतो तो आदेश त्यांच्या महत्त्वाच्या हक्कांचे रक्षण करणारा असतो. हा आदेश आता सुरक्षित राहिल्याने अशा पक्षकारांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे ताबा काढून घेण्याचा किंवा इमारत पाडण्याच्या आदेशांनाही स्थगिती दिल्याने संबंधित व्यक्तींना बेघर करता येणार नाही.-अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, माजी उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन--------------------------

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयadvocateवकिलPoliceपोलिस