भोसरीत सर्वच पक्षात बंडखोरी
By Admin | Updated: September 28, 2014 00:31 IST2014-09-28T00:31:28+5:302014-09-28T00:31:28+5:30
सर्वाचे लक्ष लागलेल्या भोसरी मतदार संघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आज भरले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संपुर्ण चित्र स्पष्ट झाले.

भोसरीत सर्वच पक्षात बंडखोरी
>पिंपरी : सर्वाचे लक्ष लागलेल्या भोसरी मतदार संघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आज भरले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संपुर्ण चित्र स्पष्ट झाले. राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप, मनसे व शिवसेनेत बंडखोरी करीत अर्ज भरले. शनिवारी 35 जणांनी अर्ज सादर केले. एकूण 4क् जणांनी अर्ज भरले.
पदयात्र, रॅली काढत उमेदवारांनी आज अखेरच्या दिवशी अर्ज भरले. हातात ङोंडे, डोक्यावर टोप्या घालून दुचाकी आणि मोटारीतून असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे आज निवडणूकीचा माहोल नागरिकांनी अनुभवला. नाही नाही म्हणत अखेर विद्यमान आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून अर्ज भरला. त्याच्या समवेत महापौर शकुंतला धराडे आणि अनेक नगरसेवक होते. काल अर्ज भरता न आल्याने शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी अर्ज दाखल केला.
नेहरुनगर परिसरातून पदयात्रेद्वारे शक्तीप्रदर्शन करीत कॉँग्रेसचे माजी महापौर हनुंमतराव भोसले यांनी अर्ज सादर केला. माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, विरोधीपक्ष नेते विनोद नढे, नगरसेवक राहुल भोसले उपस्थित होते. भाजपचे एकनाथ पवार यांनी काल अर्ज भरला होता. आज त्यांनी पक्षाचे एबी पत्र दिले. मनसेचे विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी अर्ज भरला. मनसे शहर उपाध्यक्ष अमृतराव सोनवणो यांनी बंडखोरी करीत शहराध्यक्ष मनोज साळुंखे यांच्या उपस्थितीत अपक्ष म्हणून अर्ज भरला.
राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश लांडगे यांनी बंडखोरी करीत अर्ज भरला. त्यांनी रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले. नगरसेवक वसंत लोंढे, नगरसेवक दत्ता साने यांनी बंडखोरी करत अर्ज भरला. भाजपचे बाळासाहेब गव्हाणो, विलास मेडिगरी, ज्ञानेश्वर जाधव यांनी अर्ज भरला. शिवसेनेचे विजय लांडे व युवराज कोकाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. बसपचे राजेंद्र गायकवाड व अजरुन नाटेकर यांनी अर्ज भरला. नरेश भोयर व संतोष लांबोळे (बहुजन मुक्ती पार्टी), ईश्वर कांबळे (राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी), सिद्धीकी शेख (वेल्फेअर पार्टी इंडिया), हौसेराव यादव शिंदे (भारिप बहुजन महासंघ), सुलभा गणपती उबाळे, महेश जगन्नाथ लांडगे, प्रकाश चव्हाण,
भाऊसाहेब जगदाळे, महेश आराक, मल्लिकाजरुन लिगाडे, रंजना काळभोर, मनोज लांडगे (अपक्ष) यांनी अर्ज सादर केला. (प्रतिनिधी)