शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या चारही बाजूंनी मेट्रो हवी; योग्य संस्थेचे मागणीचे पत्र हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 05:18 IST

शहरात मेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोना मार्गांचे काम जोरात सुर आहे.

पुणे: शहरात मेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोना मार्गांचे काम जोरात सुर आहे. आता शहराच्या चारही बाजूंनी मेट्रोची मागणी होत असून त्यासाठी आवश्यक त्या संस्थांनी मागणी करणारे पत्र महामेट्रो ला पाठवावे लागेल, त्यानंतरच त्यावर विचार होईल असे महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.दीक्षित यांनी शनिवारी मेट्रो कार्यालयात दोन्ही मार्गांच्या कामाचा अभियंते, ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. दोन्ही मार्गाचे काम वेळापत्रकानुसार सुरू आहे. आता स्वारगेट ते कात्रज या मार्गाची अधिकृतपणे मागणी झाली. महापालिकेने तसे पत्र दिले. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पैसे दिले. या मार्गासाठी महामेट्रो कडे तीन पर्याय आहेत. त्यापैकी एका पर्यायाची निवड करून त्या कामालाही गती दिली जाईल अशी माहिती दीक्षित यांनी दिली. सध्या सुरू आहे त्याच मार्गाच्या पुढे हा मार्ग असल्याने फंडिग व्यवस्थित झाले तर याच कामाच्या पुढे लगेचच ते कामही सुरू करता येईल असे ते म्हणाले.शहराच्या चारही बाजूंनी आता मेट्रो हवी अशी मागणी होत आहे. स्वारगेट ते खडकवासला अशी मेट्रो हवी असल्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांचे पत्र मिळाले आहे. काही नगरसेवकांनीही तशी मागणी केली आहे. मात्र त्यासाठी महापालिका आयुक्तांचे पत्र लागेल. त्याच्या प्रकल्प अहवालाचा खर्च त्यांनी द्यायला हवा. असा मार्ग झालाच पाहिजे असेच महामेट्रोचेही मत आहे. वनाज ते नियोजित शिवसृष्टी या तीन किलोमीटरच्या मार्गाचा अहवाल तयार करण्याच्या कामाला स्थायी समितीने मंजूरी दिली असल्याचे ते कामही सुरू होईल असे दीक्षित यांनी सांगितले. निगडी, चाकण, हडपसर - मुंढवा, यादरम्यानही मेट्रोच्या विस्तारीकरणाला मागणी आहे. वाघोली - खराडी मेट्रो मागार्चा डीपीआर करण्याचाही अभ्यास सुरू आहे. त्यात्या संस्थांनी यासंदर्भात महामेट्रो कडे अधिकृत मागणी करायला हवी. त्यानंतर ते पत्र केंद्र सरकारकडे जाते. त्यांची याबाबतची समिती त्याचा अभ्यास करते. त्याच्या आर्थिक बाजू पाहिल्या जातात. संबधित क्षेत्राच्या खासदार, आमदारांना त्याची माहिती दिली जाते. हरकती सुचना मागवल्या जातात, असे दीक्षित म्हणाले.नगर मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी कर्वे रोडच्या धर्तीवर डबल डेकर उड्डाणपुलाची मागणी स्थानिक आमदार जगदीश मुळीक यांनी महामेट्रोकडे केली आहे. तिथेच महापालिकेने अंडर बायपासची मागणी केली आहे. महापालिका व नागरिक यांच्यात संवाद नसल्याचे त्यावरून दिसते आहे. शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल करण्यासाठी साधारण ८० ते १०० कोटी रुपये खर्च येणार आहे. तो महापालिकेला करावा लागणार आहे, असे महामेट्रोतर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे