बारामतीत भर दिवसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:08 IST2021-07-02T04:08:35+5:302021-07-02T04:08:35+5:30

बारामती: पेट्रोल पंपावर चहा घेण्यासाठी थांबलेल्या ट्रकचालकाला बेदम मारहाण करीत त्याला लुटल्याचा प्रकार बारामती शहरात बुधवारी (दि. ३) ...

All day in Baramati | बारामतीत भर दिवसा

बारामतीत भर दिवसा

बारामती: पेट्रोल पंपावर चहा घेण्यासाठी थांबलेल्या ट्रकचालकाला बेदम मारहाण करीत त्याला लुटल्याचा प्रकार बारामती शहरात बुधवारी (दि. ३) भर दिवसा घडला. या वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी बारामती शहराजवळ ट्रकचालकाला बेदम मारहाण करत त्याच्याकडील १८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून नेले. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात तिघा अज्ञातांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार: अशोककुमार श्रीभागिरथी पटेल या ट्रकचालकाने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी हे येथील बी. एल. आर. लॉजिस्टीक ट्रान्सपोर्टच्या शाखेत चालक म्हणून काम करतात. कंपनीचे भिगवण रस्त्यावर कार्यालय आहे. फिर्यादीकडे (एमएच-४३, यू ६०२१) क्रमांकाचा ट्रक असतो. त्यात माल भरून नेण्यासाठी मॅनेजर पवन शर्मा यांच्याकडून त्यांनी २९ तारखेला १९ हजार ८०० रुपये रक्कम घेतली. ट्रक घेत ते पिंपळीतील मॅकडोनाल्ड कंपनीत माल भरण्यासाठी गेले. परंतु महिनाअखेर असल्याने ट्रकमध्ये माल भरला गेला नाही. दरम्यान, या रकमेतून १३०० रुपये फिर्यादीने खर्च केले होते. ते ट्रक माघारी घेऊन येत असताना शिवरत्न पेट्रोलपंपालगत चहा घेण्यासाठी थांबले. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना हाताने मारहाण केली, तर एकाने वीट डोक्यात घालत दुखापत केली. कपाळातून रक्त येऊ लागल्याने फिर्यादी घाबरले. या वेळी संबंधित तिघांनी पॅण्टच्या खिशातील १८ हजार ५०० रुपयांची रक्कम जबरीने काढून घेतली. त्यानंतर ते पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: All day in Baramati