शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 :सगळ्या शहरांमध्ये बजबजपुरी झाली ; राज ठाकरेंनी पुन्हा छेडला परप्रांतियांचा मुद्दा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 20:42 IST

महाराष्ट्रातल्या शहरांना आकार-उकार राहिलेला नाही. सगळ्या शहरांमध्ये बजबजपुरी झाली आहे. बाहेरच्या राज्यातून लोक येत आहेत. आज देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरत आहे आणि  बाहेरचे लोकही पोसत आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियांचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला.

पुणे : महाराष्ट्रातल्या शहरांना आकार-उकार राहिलेला नाही. सगळ्या शहरांमध्ये बजबजपुरी झाली आहे. बाहेरच्या राज्यातून लोक येत आहेत. आज देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरत आहे आणि  बाहेरचे लोकही पोसत आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियांचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला. पुण्यातील कोथरूड येथील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की , आपण घरातून उतरल्यावर चांगल्या ठिकाणी राहतो असे वाटायला हवे. सध्या मात्र सर्व शहरांमध्ये बजबजपुरी आहे. ग्रामीण भागातला तरुण शहरात येत असेल तर तो त्याचा हक्क आहे, कारण तो महाराष्ट्राचा नागरिक आहे. मात्र बाहेरच्या राज्यातून लोक येत आहेत. याशिवाय पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोर घुसखोरी करत आहेत. आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. या लोकांवर नियंत्रण ठेवण्याची राज्य सरकारची इच्छा नाही. 

यावेळी ते म्हणाले की, आज महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेले इंटरनॅशनल बोर्ड छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे काढून टाकत आहेत. आज आमचा हा महापुरुष नसता तर आपण कुठे असतो. जर शिवछत्रपती, संभाजी महाराज, पेशव्यांचा इतिहास सांगितला नाही तर पुढील पिढीला काय देणार आहोत. भारताच्या इतिहासात कोणत्याही राज्याला नाही असा इतिहास महाराष्ट्राला आहे. या इतिहासाचं सरकार काय करत आहे तर किल्ल्यांवर लग्न, समारंभांना परवानगी देत आहेत. असे निर्णय म्हणजे सत्ता डोक्यात गेल्याचे लक्षण आहे.  

यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे : 

- मनमोहन सिंग मोठे अर्थतज्ज्ञ, विद्वान आहेत. ते म्हणाले तेव्हा काळजात धस्स झालं. त्यांनी सांगितले की मंदीचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर होईल. त्याची सुरुवात झाली आहे. 

- २०१७साली नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी यांनी पन्नास दिवस द्या असे सांगितले होते. आता २०१९ सुरु आहे मात्र तरीही मंदी आहे. 

- पुण्याचे खासदार  ट्रॅफिकमध्ये अडकले तेव्हा बाणेरचा रस्ता रिकामा करायला निघाले, मग आम्ही अडकलो तर काय करायचं ?

-आज पुण्यासारख्या शहरात वाहनांचा सर्वाधिक धोका आहे. इथले रस्ते अपुरे आहेत. रस्त्यावर गाड्या पार्क होतात कारण मोकळे भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जातात. 

-विरोधासाठी विरोध करण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका नाही. नरेंद्र मोदींच्या भूमिका चुकल्या त्यावर प्रहार केले आणि ३७० साठी अभिनंदन करणारा मीच होतो. मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत ते ३७० सोडून महाराष्ट्राचे तरुण, तरुणी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी  कधी बोलणार?

-सत्त्ताधाऱ्यांची सभांसाठी आणि मेट्रोसाठी रात्रीतून झाडे छाटण्याची हिंमत कशी होते यामागचे कारण सत्ता डोक्यात जाते.

- आमचे उमेदवार स्थानिक आहेत, सत्तेची हवा डोक्यात न जाणारे आहेत. आणि ती गेलीच  तर टाचणी लावायला मी आहेच. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019