जिल्हा बँकेच्या सर्व शाखा ३१ मार्चपर्यंत दररोज सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST2021-03-15T04:12:05+5:302021-03-15T04:12:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना व मार्चअखेरचा विचार करून बँकेच्या ग्राहकांच्या सोयीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शहर ...

जिल्हा बँकेच्या सर्व शाखा ३१ मार्चपर्यंत दररोज सुरू राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना व मार्चअखेरचा विचार करून बँकेच्या ग्राहकांच्या सोयीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाखा ३१ मार्चपर्यंत एकही सुट्टी न घेता दररोज सुरू राहणार आहे. या कालावधीत वीजबिल व कर्जवसुली भरणा दररोज चालू ठेवण्यात येणार असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह धा. चव्हाण यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ कंपनीची विद्युत बिले स्वीकारणेबाबत बँकेने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीशी करार केलेला आहे. त्यानुसार बँकेच्या विविध शाखांमार्फत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची विद्युत बिले स्वीकारली जातात. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने दररोज वीजबिल भरणा करुन घेणेबाबत बँकेस कळविलेनुसार सहकार्याच्या दृष्टीने व बँकेला मिळणारे उत्पन्न विचारात घेऊन बँकेच्या सर्व शाखा कार्यालय ३१ मार्चपर्यंत दररोज (मार्च महिन्यातील सर्व सार्वजनिक सुट्टीचे दिवस १३, १४, २१, २७, २८ व २९ मार्च ग्राहकांचे वीजबिल भरणा स्वीकारण्यासाठी शाखा सुरु ठेवण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे त्या दिवशी ठेवी संकलनासाठी जमा व्यवहार कर्जवसुलीच्या अनुषंगाने जमा-नावे ट्रान्सफर व्यवहार इ. बाबतचे कामकाज ३१ मार्चअखेर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील करावे. या दिवशी दैनंदिन आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी. व्यवहार व आऊटवर्ड क्लिअरिंग व्यवहार इ. बंद राहतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.