मद्यपींना पायथ्याला रोखले

By Admin | Updated: January 1, 2015 01:11 IST2015-01-01T01:11:59+5:302015-01-01T01:11:59+5:30

नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी बुधवारी खडकवासला - सिंंहगड परिसरात पर्यटकांची गर्दी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. यंदा पोलीस, वनविभाग व शिवप्रेमी संघटनांकडून सिंंहगड पायथा परिसरात रोखले.

The alcoholics were put to rest | मद्यपींना पायथ्याला रोखले

मद्यपींना पायथ्याला रोखले

खडकवासला : नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी बुधवारी खडकवासला - सिंंहगड परिसरात पर्यटकांची गर्दी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. यंदा पोलीस, वनविभाग व शिवप्रेमी संघटनांकडून सिंंहगड पायथा परिसरात रोखले.
सकाळपासूनच शहर परिसरात व गडावर धुके होते. तसेच, हवेत कमालीचा गारवा जाणवत होता, तर अधूनमधून या परिसरातील वातावरण ढगाळ होत असल्यानेच पर्यटकांचे प्रमाण काहीसे कमीच होते. शहराचे उपनगर परिसरातही असेच वातावरण असल्यामुळेच कदाचित पुणेकरांकडून आजच्या दिवशी सिंंहगड, खडकवासला व पानशेत या पर्यटनस्थळांकडे पाऊले वळत नव्हती. दुपारनंतर काही प्रमाणात सिंंहगडावर पर्यटकांची गर्दी वाढली होती; मात्र नेहमीपेक्षा गर्दीचे प्रमाण कमीच जाणवत होते. सिंंहगडाच्या पायथ्याला वनसंरक्षण समितीच्या उपद्रवशुल्क नाक्यावर घेरा सिंंहगड वनसंरक्षण समितीचे सुरक्षा रक्षक, वनकर्मचारी, पोलीस, सिंंहगड पावित्र्य मोहीम, राजे शिवराय प्रतिष्ठान, शिवसेना, युवासेनेचे कार्यकर्त्यांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती.जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या, सिगारेट, तंबाखू व गुटखा लगेचच नष्ट करण्यात येत होता. (वार्ताहर)

१ हवेली पोलिसांकडून खडकवासला, सिंंहगड परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खडकवासला, नांदेड, डोणजे व सिंंहगड पायथ्याला वाहनांची तपासणी केली जात होती.
२ सिंंहगड येथे वनपरिक्षेत्र अधिकारी जहागीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल प्रभाकर कड, एम. पी. धुमाळ, वनरक्षक जी. एम. सरोदे, एम. एम. चव्हाण, विद्या पवार, संदीप कोळी व इतर वनकर्मचारी हे वनसंरक्षण समितीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सिंंहगड घाट व वनपरिसरात गस्त घालून कोणालाही दारू पिऊन दंगामस्ती करून देत नव्हते.

३ तपासणी मोहिमेत सरपंच गुलाब थोपटे, युवासेनेचे सचिन पासलकर, माजी सरपंच विजय कोल्हे, नंदकिशोर मते, संतोष गोपाळ, अनिकेत देशमुख, प्रवीण पायगुडे, सुशांत खिरीड, कुंडलिक खिरीड, अनिल जाधव, अनंता थोपटे हे सहभागी झाले होते.
४ आज सिंंहगडावर ५६१ दुचाकी व २६३ वाहने उपद्रवशुल्क घेऊन गडावर गेली होती. त्यांच्याकडून वनसंरक्षण समितीने २५ हजार ७७० रुपये उपद्रवशुल्क जमा केले. तर, आठशे रुपये दंड वसूल करण्यात आला.

Web Title: The alcoholics were put to rest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.