आळंदीकरांना मिळणार पुरेशा दाबाने पाणी
By Admin | Updated: October 12, 2015 01:34 IST2015-10-12T01:34:07+5:302015-10-12T01:34:07+5:30
आळंदीकरांचा अशुद्ध आणि कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता संपणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत शहरात मोठ्या व्यासाची जलवाहिनी व चार ठिकाणी

आळंदीकरांना मिळणार पुरेशा दाबाने पाणी
आळंदी : आळंदीकरांचा अशुद्ध आणि कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता संपणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत शहरात मोठ्या व्यासाची जलवाहिनी व चार ठिकाणी जलकुंभ बांधण्यासाठी ८.६५ कोटींना मंजुरी मिळाली असून, त्या कामाचा नुकताच कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे.
या आराखड्यांतर्गत २३१ कोटींचा निधी तीर्थक्षेत्र आळंदीला मिळाला असून, यातून शहर विकासाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. १८ कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प, ९ कोटींचा सिद्धबेट परिसरातील माऊली सृष्टी विकास, देहू फाटा ते डुडुलगाव रस्ता, सुलभ शौचालय ही कामे सुरू आहेत. आता नव्याने जलवाहिनी व रस्त्यांची कामेही सुरू होणार आहेत. आळंदीत १९८८ साली जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यानंतर परिसरातील लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे.
पूर्वीची मुख्य जलवाहिनी ही ८ इंच व्यासाची असून, प्रमुख रस्त्यांवर ती ६ इंच, तर गल्लीत फक्त ४ इंचाची आहे. लाईन जुनी झाल्यामुळे बहुतांश ठिकाणी तिला लिकेज आहेत. त्यामुळे आळंदीकरांना कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
तसेच अशुद्ध पाणी हाही त्याचा मोठा प्रश्न आहे. आता नव्याने जलवाहिनी टाकण्यात येणार असून, ती १२ इंच व्यासाची आहे. तसेच, गल्लीत ती ६ इंच व्यासाची
असणार आहे. तसेच नव्या कामात पाण्याचे आॅडिट केले जाणार असल्याने पुरेशा दाबाने पाणी मिळणे शक्य होणार आहे. (वार्ताहर)