आळंदीत पार्किंग महागले
By Admin | Updated: September 8, 2014 04:11 IST2014-09-08T04:11:38+5:302014-09-08T04:11:38+5:30
संत शिरोमणी संतश्रेष्ठ श्री़ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीने पावन झालेल्या अलंकापुरीमध्ये वाहनतळाच्या नावाखाली वारकऱ्यांची लूट सुरू आहे़

आळंदीत पार्किंग महागले
आळंदी : संत शिरोमणी संतश्रेष्ठ श्री़ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीने पावन झालेल्या अलंकापुरीमध्ये वाहनतळाच्या नावाखाली वारकऱ्यांची लूट सुरू आहे़ पार्किंगचे दर जवळपास दुप्पट झाल्याने भाविक नाराजी व्यक्त करीत आहेत.
संत शिरोमणी
ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर जगातून दररोज हजारो भाविक अलंकापुरीत येतात. त्यांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था नगरपरिषदेमार्फत झाडीबाजार येथे करण्यात येते.
यापूर्वी सन २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षासाठी मे़ शिवसाई इंटरप्रायजेस या ठेकेदारामार्फत पार्किंग ठेके देऊन करारानुसार जुन्या दराप्रमाणे वसुली केली जात होती़ परंतु संबंधित ठेकेदाराला कराराप्रमाणे जागा न दिल्यामुळे संबंधित ठेकेदार दि़ १/४/२०१४ रोजी न्यायालयात गेला़ त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने संबंधित ठेकेदारास मुदतवाढ दिली़ परंतु त्यानंतर अचानकपणे त्याचा ठेका बंद करण्याचे आदेश नगर परिषदेने दिले व नवीन दराने वारकऱ्यांची लूट सुरू केली आहे़
याबाबत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना विचारण्यासाठी गेले असता, ते सुट्टीमुळे उपस्थित नव्हते़
या बाबत नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांना विचारले असता, जुन्या ठेकेदारास जागा न मिळाल्यामुळे तो न्यायालयात गेला आहे़ परंतु जागा उपलब्ध करुण देणे हे प्रशासनाचे काम आहे, असे ते म्हणाले़ प्रशासनास दि़ २५/८/२०१४ च्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित ठेकेदाराची थकबाकी भरुन घेऊन त्यास ठेका देण्यात यावा असा ठराव क्ऱ २६३ सर्वानुमते मंजूर झाला आहे़ तरीही त्याचा ठेका का बंद केला हे माहीत नाही़ नवीन दराप्रमाणे नगर प्रशासन दररोज सरासरी दहा हजार रुपये कमवित असून वारकऱ्यांची व भाविकभक्तांची लूट करीत आहे, असे नागरिक बोलत आहेत़ (वार्ताहर)