संत परंपरेला गालबोट लावाल; तर ते खपवून घेतले जाणार नाही : आळंदीकरांनी सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 03:20 PM2021-07-01T15:20:26+5:302021-07-01T15:21:13+5:30

आषाढीला माऊलींच्या तसेच तुकोबांच्या पालखी सोहळ्यात पायीवारी करणारे लाखो वारकरी आहेत.

Alandi citizens aggressive due to Ashadhi pandharpur wari | संत परंपरेला गालबोट लावाल; तर ते खपवून घेतले जाणार नाही : आळंदीकरांनी सुनावले खडेबोल

संत परंपरेला गालबोट लावाल; तर ते खपवून घेतले जाणार नाही : आळंदीकरांनी सुनावले खडेबोल

Next

आळंदी : यंदाही गतवर्षीप्रमाणे आषाढी वारी सोहळा बसने पंढरपूरला जाणार आहे. त्याबाबत राज्य शासनाने आदेशही जारी केला आहे. मात्र असे असतानाही हा वारी सोहळा परंपरेनुसार पायी झाली पाहिजे अशी मागणी करणाऱ्यांना आळंदीतील ग्रामस्थांनी खडेबोल सुनावले आहेत. आळंदीत येऊन जर कोणी संत परंपरेला गालबोट लावणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका आळंदीकर ग्रामस्थांनी मांडली आहे.

आषाढीला माऊलींच्या तसेच तुकोबांच्या पालखी सोहळ्यात पायीवारी करणारे लाखो वारकरी आहेत. मात्र गेल्या वर्षभरापासून देशावर कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तसेच खबरदारीचा उपाय म्हणून गतवर्षीप्रमाणेच यंदाही माऊलींची वारी लालपरीतून होणार आहे. वास्तविक कोविडचा धोका लक्षात घेऊन आळंदीतील स्थानिक ग्रामस्थांनीही यंदाची वारी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत करण्याची मागणी केली होती. तसेच पुणे जिल्ह्याबाहेरील वारीच्या ठिकाणच्या गावांनी पायीवारीला विरोध दर्शवत पायी वारी नकोच अशी स्पष्ट सूचना मांडली आहे. त्यानुसार शासनानेही यंदाची वारी गतवर्षीप्रमाणे साजरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, यंदाची आषाढी वारी परंपरेनुसारच व्हावी अशी मागणी ज्येष्ठ वारकरी ह.भ.प. बंडातात्या कराडकर तसेच काही ठराविक वारकरी संघटना व भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून केली जात आहे. त्यातच ज्येष्ठ वारकरी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी नुकताच आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून म्हटले आहे की, मी उद्या दुपारी २ वाजता माझ्या हजारो व्यसनमुक्तीचे मावळे व काही वारकरी संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत आळंदीत प्रवेश करणार आहे.

या विरोधात आळंदीकर ग्रामस्थांनी एकत्र येऊन खडेबोल सुनावले आहेत. आळंदीकर ग्रामस्थ म्हणून प्रस्थान सोहळ्याला देवस्थानचे निमंत्रित केलेल्या वारकऱ्यांचे आम्ही स्वागत करू; मात्र विरोधी भूमिका घेणाऱ्यांना आळंदीकर खपवून घेणार नाही असे ठणकावून सांगितले आहे.

Web Title: Alandi citizens aggressive due to Ashadhi pandharpur wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.