अक्कलकोट स्वामी दैनंदिनी भक्तांसाठी मेजवानी : मोरे
By Admin | Updated: January 9, 2015 00:55 IST2015-01-09T00:55:15+5:302015-01-09T00:55:15+5:30
अक्कलकोट स्वामी दैनंदिनीत प्रांपचिक व पारमार्थिकतेचा मेळ घातला असून संतकवी दासगणू महाराज विरचित श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्रामुळे ही दैनंदिनी स्वामीच्या भक्तांसाठी मेजवानीच आहे,’

अक्कलकोट स्वामी दैनंदिनी भक्तांसाठी मेजवानी : मोरे
पुणे : अक्कलकोट स्वामी दैनंदिनीत प्रांपचिक व पारमार्थिकतेचा मेळ घातला असून संतकवी दासगणू महाराज विरचित श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्रामुळे ही दैनंदिनी स्वामीच्या भक्तांसाठी मेजवानीच आहे,’ असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
राम दहाड संपादित ‘श्री अक्कलकोट स्वामी दैनंदिनी २०१५’ चे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. त्यावेळी मोरे बोलत होते. यावेळी संपादक राम दहाड, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, श्रीराम दहाड, गोपाळकृष्ण दहाड आदी उपस्थित होते.
या दन्ौंदिनीतील स्वामींचे अल्पचरित्र, वैयक्तिक माहिती, नामजप मंत्रे, तारक मंत्र, पुणे शहरातील पीनकोड, केंद्रीय मंत्रीमंडळ, वृत्तपत्र, मिडिया, पोलीस कार्यालयांचे दूरध्वनी क्रमांकामुळे तसेच वैयक्तिक नोंदीसाठी ही दैनंदिनी उपुयक्त असल्याने दैनंदिनी धारकाची प्रत्येक दिवसाची उत्सुकता जागृत होईल, असेही मोरे यांनी नमूद केले.
‘दैनंदिनी’ ही लोकजीवनाचा अविभाज्य भाग आह स्वामी समर्थांच्या या दैनंदिनीतून स्वामी समर्थ, दत्त संप्रदाय, उपासना, तीर्थक्षेत्रे या सारख्या विषयांबरोबरच नव्याने येणाऱ्या कुंभमेळव्याच्याही माहिती देऊन दैनंदिनी परिपूर्ण झाली आहे, असे मत डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
अक्कलकोट स्वामींचे आशीर्वाद व भक्तगणांच्या पाठींब्यावर या दैनंदिनीचे प्रकाशन करू शकलो. ही दैनंदिनी अधिक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे राम दहाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)