गृह खातं अजित दादांना देणार नाही, पण..; थेट बारामतीतून फडणवीसांची स्तुतीसुमने

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 01:42 PM2024-03-02T13:42:24+5:302024-03-02T14:08:43+5:30

पश्चिम महाराष्ट्रातील नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बारामतीत ५५ हजार तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात येत आहे.

Ajit will not give the house account to Dada, but..; Praise for Devendra Fadnavis straight from Baramati | गृह खातं अजित दादांना देणार नाही, पण..; थेट बारामतीतून फडणवीसांची स्तुतीसुमने

गृह खातं अजित दादांना देणार नाही, पण..; थेट बारामतीतून फडणवीसांची स्तुतीसुमने

मुंबई/पुणे - बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यामुळे राज्यातील सर्वच दिग्गज नेते आज बारामतीत एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, अजित पवार यांच्यासह खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पवार कुटुंबीयांत राजकीय वातावरण तापलं असतानाच, सुनेत्रा पवार याही नमो रोजगार मेळाव्याच्या व्यासपीठावर दिसून आल्या. एकीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याचे चित्र आहेत. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस यांनीही बारामतीतून अजित पवारांवर स्तुतिसुमने उधळली. 

पश्चिम महाराष्ट्रातील नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बारामतीत ५५ हजार तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून रोजगार घेणारे आणि रोजगार देणाऱ्यांना एकत्र आणण्याचं काम या मेळाव्यातून करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने प.महाराष्ट्रातील हा मेळावा बारामतीत होत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. फडणवीसांनी बारामतीच्या व्यासपीठावरुन अजित पवारांवर मोठी स्तुतिसुमने उधळली. यावेळी, गृहमंत्री पद मी तुम्हाला देणार नाही, पण गृह खात्यासाठी तुमची मदत नक्कीच घेईल, असेही फडणवीस यांनी म्हटले. 

अजित पवारांनी नमो रोजगार मेळाव्यासाठी खूप मेहनत केली आहे. या मेळाव्यासह बारामतीमधील बस स्थानक आणि पोलीस आयुक्तांच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्याहस्ते झाले. याचा उल्लेख करत अजित पवारांच्या नेतृत्त्वात बारामधील बस स्थानक हे एखाद्या विमानतळासारखं वाटावं, एवढं सुंदर व सुसज्ज आहे. बारामतीमधील पोलीस स्टेशन, पोलीस उपायुक्त कार्यालय किंवा पोलिसांच्या क्वार्टर्सच्या इमारती पाहिल्यावर हे सरकारी बांधकाम आहे, असं वाटतच नाही. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं असावं एवढं सुंदर कार्यालय अजित दादांनी बारामतीकरांना दिलं आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. 

आता, माझ्यामागे लोकं लागतील की, मला बारामतीलाच पोस्टींग द्या. कारण, एवढं चांगलं कार्यालय आणि एवढं चांगलं निवासस्थान केवळ बारामतीमध्येच आहे. दादा मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की, तुम्ही स्वत: लक्ष घालून एवढ्या चांगल्या इमारती बांधल्या, मला आता मोह होत आहे की, आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, तिथं पीएमसी म्हणून तुम्हालाच नियुक्त करावं. म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील. अर्थात, दादा मला हळूच म्हणू शकतील की पीएमसी कशाला, खातंच माझ्याकडे द्या. पण, दादांना खातं देणार नाही, ते माझ्याकडेच ठेवेन. मात्र, तुमची मदत ह्या चांगल्या इमारती बांधण्याकरिता निश्चित घेईल, असे फडणवीसांनी थेट बारामतीच्या मंचावरुन म्हटले. 

दरम्यान, बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या या इमारती आहेत, यातून लोकांची कामे होतील, असे म्हणत फडणवीसांनी बारामतीकरांचे अभिनंदन केले. यावेळी, अजित पवारांवर स्तुतिसुमने उधळली. 

 

Web Title: Ajit will not give the house account to Dada, but..; Praise for Devendra Fadnavis straight from Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.