शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांची होमपीचवरही तुफान फटकेबाजी, या आमदारानं केली बॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 20:35 IST

क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन : 

ठळक मुद्देपवार कुटुंबिय आणि बारामतीचे वेगळे नाते आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या आजच्या बँटींगने हे नाते अधोरेखित झाले. सतीश खुडे हा कार्यकर्ता दरवर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करतो.

पुणे/बारामती  :  शहरात रविवारी(दि २७) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धावता दौरा चर्चेचा विषय ठरला. कारण उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले. तसेच मैदानावर काही काळ बॅटींगदेखील केली. यावेळी बारामतीकरांनी टाळ्या वाजवत पवारांच्या खेळीचे कौतुक केले. तर, मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी अजित पवारांना बॉलिंग टाकली.

पवार कुटुंबिय आणि बारामतीचे वेगळे नाते आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या आजच्या बँटींगने हे नाते अधोरेखित झाले. सतीश खुडे हा कार्यकर्ता दरवर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करतो. यंदा देखील त्याने हे सामने भरवले आहेत. त्यासाठी मुंबईत  जनता दरबारात पोहचत उपमुख्यमंत्री पवार यांना मैदानावर येण्याची विनंती केली.

पवार यांनी देखील रविवारी धावपळीच्या दौऱ्यात वेळ दिला. व्यस्त दिनक्रमातुन वेळ काढत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट स्टेडीयमवर दिलखुलासपणे मैदानावर बॅटींग करीत या सामन्यांचे अजित पवार यांनी उद्घाटन केले. व्यासपीठावरही जात क्रिकेटपटुंशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर ते काटेवाडी कडे मार्गस्थ झाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBaramatiबारामतीMLAआमदार