शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

'तडीपार करूनही सुधारला नाही तर मोका लावू', अजित पवारांचा गुन्हेगारांना स्पष्ट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 15:00 IST

गुंडांना शिक्षा होणारच...

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहराची सार्वजिक सुरक्षितता सरकारची जबाबदारी आहे. गुन्हगारांची गय केली जाणार नाही. सर्वांना सुरक्षित जगता आले पाहिजे. जो गुंडगिरी करत असेल, दहशत करत असेल तो कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असेल, त्याचा आम्ही विचार करणार नाही. त्याच्यावर जर चार - पाच गुन्हे दाखल झाले असतील तर त्याला आम्ही तडीपार करु. तडीपार करुनही तो सुधारला नाही तर थेट मोक्का लावू, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे दिला.

पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, प्रदेशचे रविकांत वरपे, सुनील गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, जगदीश शेट्टी, भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.कोणाची गुंडगिरीही खपवून घेतली जाणार नाही. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मी कडवट बोलतो पण, व्यवहार्य बोलतो. आम्हाला कोणाला विनाकारण त्रास द्यायचा नाही. मात्र, कोणाची गुंडगिरीही खपवून घेतली जाणार नाही. महिलांनी निर्भयपणे फिरावे, असे वातावरण हवे. ’’कमीशन मिळेल त्यांचाच विचार भाजपाने केला‘‘पाच वर्षे महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या भाजपने केवळ स्वार्थाचे विषय मार्गी लावले. 'कमिशन' जास्त कसे मिळेल, याचा विचार केला. घरचा पैसा असल्यासारखी उधळपट्टी करत शहर बॅकफुटवर गेले. सहा कोटी रूपये खर्चुन कुत्र्यांची नसबंदी केली. नसबंदीसाठी सोन्याची उपकरणे वापरलीत काय, श्वानांच्या नसबंदीत कमिशन मिळविले, असा प्रश्न पवार यांनी केला.  ज्यांच्या अंगातच पाणी नाही ते काय रोज पाणी देणारपवार म्हणाले, ‘‘भाजपला पाच वर्षात आंद्रा, भामा - आसखेड धरणातून पिंपरी - चिंचवडकरांकरिता पाणी आणता आले नाही. ज्यांच्या अंगातच पाणी नाही ते काय रोज पाणी देणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे १०० नगरसेवक निवडून द्या शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करु,  मी शहरवासीयांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करणार नाही. प्रश्न सोडविण्याची धमक, ताकद आमच्यात आहे. अन्यथा अजित पवार नाव सांगणार नाही.’’

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवार