शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांची अनुपस्थिती अन् चर्चांना उधाण; पण टोपेंनी सांगितलं यामागचं नेमकं 'कारण' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 16:32 IST

दर आठवड्याला न चुकता ज्या बैठकीला अजित पवार हजेरी लावतात त्या पुणे जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीला आज चक्क ते गैरहजर राहिले आहेत.

पुणे : पुण्यात दर शुक्रवारी होणाऱ्या कोरोना बैठकीकडे सर्व पुणेकरांचेच लक्ष लागलेले असते. अनेक महत्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जातात. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आजपर्यंत दर शुक्रवारी ही आढावा बैठक आयोजित केली जाते. या बैठकीचे केंद्रबिंदू असतात ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार. या बैठकीत ते लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुणे, पिंपरी आणि जिल्ह्याचा हालहवाल जाणून घेत अनेक निर्णय जाहीर करतात. पण आजची कोरोना आढावा बैठकीला अजित पवारांची अनुपस्थिती सुरुवातीलाच उपस्थितांच्या भुवया उंचावून गेली. नेमकं काय कारण असेल की अजितदादांनी या बैठकीला गैरहजेरी लावली याबाबत कुजबुज सुरु झाली. पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अजित पवारांच्या अनुपस्थितीमागचं 'नेमकं कारण' सांगितलं आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला. 

दर आठवड्याला न चुकता ज्या बैठकीला अजित पवार हजेरी लावतात त्या पुणे जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीला आज चक्क ते गैरहजर राहिले आहेत. विशेष म्हणजे अचानक पुण्यात आलेल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही बैठक घेतली आहे. 

पुणे जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पालक मंत्री अजित पवार हे शुक्रवारी किंवा शनिवारी बैठक घेतात. त्यानुसार आज देखील या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात जीएसटी बाबत असलेल्या बैठकीला हजेरी लावून अजित पवार हे दोन वाजता कोरोना आढावा बैठक घेणार होते. त्यापाठोपाठ वारी संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र  पुण्यात असुनही या बैठकीला अजित पवार आलेच नाहीत. त्याऐवजी अचानक पुण्यात आलेल्या आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही बैठक घेतली. 

अजित पवार हे सकाळी जीएसटी संदर्भातील बैठकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात होते. ही बैठक लांबल्याने पवार विभागीय आयुक्त कार्यालयातील कोरोना आढावा बैठकीला आले नाहीत असं सांगितले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपे