शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

सुप्रिया'ताईं'साठी अजित'दादांनी केली हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 15:51 IST

राजकारणात कधी कोणाची गरज भासेल हे सांगता येत नाही. याच समीकरणानुसार बारामती लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्याकरिता अजित पवार यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली.

 

पुणे : राजकारणात कधी कोणाची गरज भासेल हे सांगता येत नाही. याच समीकरणानुसार बारामती लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्याकरिता अजित पवार यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. २०१४साली दुभंगलेली मने मतांसाठी जुळवण्याचा हा पवार यांचा प्रयत्न असून 'तुम मुझे लोकसभा दो, मैं तुम्हे विधानसभा दूंगा' असा मानण्यात येतो आहे. 

पुण्यात शुक्रवारी पाटील यांच्या घरी अजित पवार यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण यांनी हजेरी लावल्याचे बघायला मिळाले. २०१४साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडी झाली नसल्याने राष्ट्रवादीने पुरंदरमध्ये संजय जगताप आणि इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा केलेला पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटेदेखील खूप प्रयत्नांनी निवडून आले. हे तीनही मतदारसंघ बारामतीत येत असल्याने राष्ट्रवादीला चांगल्या मताधिक्यासाठी पाटील यांची गरज आहे. दुसरीकडे भाजपने कांचन कुल यांच्या रूपाने सुळे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. त्यात कुल कमळावर लढणार असल्याने त्यांना खड़कवासल्यातून फायदा होण्याची चिन्हे आहेत. त्यांचे बारामती तालुक्यात नातेसंबंध असल्यामुळे तिथेही सुळे यांना मतांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. अशावेळी पुरंदर, भोर आणि इंदापूरची मते सुळे यांच्याकरीता महत्वाची ठरणार आहे. म्हणून मागील निवडणुकीत दुखावलेल्या पाटील यांची समजूत काढण्यासाठी स्वतः पवार त्यांच्या घरी पोचल्याचे चित्र दिसून आले.  

यावेळी झालेल्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांना सांगितले की, 'आघाडी झालेली आहे. आगामी विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांना भोर, संजय जगताप यांना  पुरंदर आणि इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा गांभीर्याने विचार करावा अशी चर्चा झाली. अजित पवार यांनी मात्र बोलताना, 'जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी,  टोकाची भूमिका न घेता कार्यकर्त्यांमध्ये चांगले वातावरण तयार व्हावे याकरिता बैठक आयोजित केल्याचे सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारbaramati-pcबारामती