शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 06:31 IST

शासनाची १५२ कोटींची फसवणूक; मुद्रांक शुल्क भरले फक्त ५०० रुपये; अमेडिया कंपनीचा पत्ता पार्थ पवारांच्या घराचा

समिती करणार चौकशी; सह दुय्यम निबंधकावर निलंबनाची कारवाई; अजित पवार यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणेः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून १,८०० कोटींचे बाजारमूल्य असणारी जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या खरेदी व्यवहारात शासनाची १५२ कोटींची फसवणूक फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. यात सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. यावरून राजकीय राळ उठली असून, अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत.

मुंढवा येथील जमीन प्रकरणात मालमत्ता पत्रकावर राज्य सरकारची मालकी असताना खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला. जमीन विक्रीची परवानगी घेण्यापूर्वी जमीन मूल्याच्या ५० टक्के नजराणा भरणे अपेक्षित असताना संबंधित कंपनीने तो न भरताच सातबारा उताऱ्याच्या आधारे व्यवहार पूर्ण केला.

यातून १४६ कोटी रुपयांची, तसेच व्यवहार करताना दोन टक्के मुद्रांक शुल्काची सहा कोटी रुपयांची रक्कम भरली नाही. त्यामुळे राज्य सरकारची १५२ कोटी रुपयांची फसवणूक झाली. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अमेडिया एंटरप्राईजेस एलएलपी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या कंपनीचा पत्ता पार्थ पवार यांचा रहिवासी बंगला

जमीन खरेदीची सखोल चौकशी करणार : मुख्यमंत्री१. नागपूर : पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणासंदर्भात सर्व माहिती मागविली असून योग्य चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीच्या आधारावर यासंदर्भात पावले उचलू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.२. प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर आले आहेत ते गंभीर आहेत. त्याबाबत पूर्ण माहिती घेऊनच बोलेना उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील कुठल्याही प्रकाराला पाठीशी घालणा नाहीत. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

मुंबई: पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक सुहास दिवसे यांच्यामार्फत सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक (मुख्यालय), पुणे राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. सात दिवसांत ही समिती अहवाल सादर करेल.

सह दुय्यम निबंधकासह तिघांवर गुन्हा दाखल

जमीन व्यवहार प्रकरणी संतोष हिंगणे (सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यारपत्र असलेली शीतल किशनचंद तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आधीच सांगितले होते, चुकीचे व्यवहार मान्य नाहीत : अजित पवार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पुण्यातील कथित जमीन व्यवहार प्रकरणाशी आपला दुरान्वयानेही संबंध नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. परंतु, त्याचवेळी मागे तीन-चार महिन्यांपूर्वी अशा प्रकारच्या गोष्टींची चर्चा ऐकली होती आणि त्यावेळीच मी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, कोणतेही चुकीचे व्यवहार मला मान्य नाहीत, असेही त्यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, त्यानुसार ती चौकशी जरूर व्हावी आणि सत्य काय आहे ते समोर यावे. सदर व्यवहारातील पत्ता हा माझ्या वैयक्तिक घराचा नसून, तो बंगला पार्थ अजित पवार यांच्या नावावर असल्याचेही पवार यांनी सांगितले. मुले सज्ञान होतात तेव्हा त्यांचा व्यवसाय करतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

माझा पाठिंबा नाही

अजित पवार म्हणाले, आजपर्यंत भी कुठल्याही नातेवाईकांच्या संदर्भात अधिकाऱ्यांना फोन केला नाही किंवा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केला नाही. माझ्या नावाचा दुरूपयोग करून कुणी चुकीचे काम करत असेल, तर त्याला माझा कोणताही पाठिंबा नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Parth Pawar's Land Scam: 300 Crore Purchase of 1800 Crore Land

Web Summary : Parth Pawar's company allegedly bought land worth ₹1800 crores for ₹300 crores, defrauding the government of ₹152 crores. An inquiry is underway, and an official has been suspended. Opposition demands Ajit Pawar's resignation. Chief Minister orders investigation, emphasizing zero tolerance for wrongdoing. Ajit Pawar denies involvement.
टॅग्स :parth pawarपार्थ पवारAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस