शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अजित पवार गायबच! त्यांनी पुण्यातून कारभार चालवावा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 14:22 IST

केंद्रांनी सर्वाधिक रेमडेसीवीर महाराष्ट्राला दिले. आणखी साठी मी भीक मागायला तयार: पाटील

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे गायबच होते, असा दावा भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. अजित पवारांनी पुण्यात शिफ्ट व्हावे आणि इथून कारभार चालवावा किंवा पालकमंत्री पद दुसऱ्या कोणाला तरी द्यावे असेही पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार हे गायब असल्याचा दावा केला होता. त्यानंतर अजित पवारांनी पत्रक काढत भाजप नेत्यांवर टीका केली होती आणि मी आपल्या कार्यकर्त्यांसाठी सतत उपलब्ध असतो. तसेच भाजप चे नेते देखील मला भेटत असतात असा दावा केला होता. याबाबत बोलताना पाटील यांनी पुन्हा हा दावा केला आहे. 

पुण्यामध्ये शुक्रवारी ( दि. २३) चंद्रकांत पाटील यांचा हस्ते कोविड केअर सेंटर चे उदघाटन झाले. एसएनडीटी कॉलेज मध्ये हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. १०० बेड चे हे केंद्र विलगीकरणासाठी उपयोगी ठरणार आहे. या उद्घाटनानंतर पाटील बोलत होते. 

अजित पवारांचा वक्तव्याबाबत पाटील म्हणाले " देशात लोकशाही आहे त्यामुळे कोणीही काहीही बोलू शकते. पण मी चॅलेंज केले होते की, अजित पवारांना फोन लावून द्या, कारण ते गायबच होते. २४ तास ते कोणालाच उपलब्ध झाले नव्हते. अजित पवारांच्या कार्यक्षमतेबद्दल माझा मनात शंका नाही. पण वाढत असलेला कामाचा व्याप पाहता मला असा वाटतं की, त्यांनी एकतर पुण्यातून किंवा मुंबईतून कारभार चालवावा. आणि पुण्याला वेगळा पालकमंत्री द्यावा. पण एकूण गरज लक्षात घेता त्यांनी पुण्यातून कारभार चालवायला पाहिजे आणि पुण्यात सहज उपलब्ध व्हायला हवे. लोकांना आता दिलासा हवा आहे." 

दरम्यान. रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत राजेश टोपे यांनी केलेल्या दाव्याबद्दल पाटील म्हणाले " ग्लास अर्धा भरला आहे असाही म्हणता येतं किंवा रिकामा आहे असेही म्हणता येतं. महाराष्ट्र सरकारने त्यांचं अपयश लपवण्यासाठी सारखे केंद्राकडे जायचे ठरवलंय. नाहीतर तो चार्ट पहिला तर सगळ्यात जास्त इंजेक्शसन ही महाराष्ट्राला मिळाली आहेत. १० दिवसांसाठी.तब्बल २ लाख ६९ हजार इंजेक्शन्स दिली आहेत.  ज्या गुजरातच्या नावाने आरडाओरडा होतो त्यांना पण १ लाख ४० हजार मिळाली आहेत. 

रेमडेसिवीर मिळत नसल्याचा दावा करत पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आपण एक कोटी रुपये घेऊन अजित पवारांच्या टेबलवर ठेवा असं सांगितल्याचे ही पाटील म्हणाले. " मी एक घोषणा करतो. महापालिका आणि सरकार ला अ‍ॅडव्हान्स पैसे देता येत नाहीत. तर जो डिस्ट्रिब्युटर अ‍ॅडव्हान्स पैसे मागेल त्याला भीक मागून पैसे गोळा करून मी देणा आहे. त्यांचे मिळाले की मला परत द्यायचे. मी मागितले की भीक जास्त मिळते. १०० कोटींचे इंजेक्शन घेऊ. संपूर्ण महाराष्ट्रात मी अ‍ॅडव्हान्स द्यायला तयार आहे"

टॅग्स :PoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलcorona virusकोरोना वायरस बातम्या