शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Ajit Pawar: 'मला वाटेल तेव्हा मी बोलेन, तो माझा अधिकार'; पहाटेच्या शपथविधीवरुन अजित पवार पुन्हा संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 13:29 IST

राज्यात सत्तास्थापनेच्या संघर्षात पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा आता मागे सरला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

पुणे-

राज्यात सत्तास्थापनेच्या संघर्षात पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा आता मागे सरला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पहाटेच्या शपथविधीसाठी तुम्हीच अजित पवार यांना पाठवलं होतं असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला असता त्यांनी मी पाठवलं असतं तर सत्ता स्थापन झाली असती असं म्हणत साऱ्या चर्चा फेटाळून लावल्या. याच मुद्द्याबाबत आज अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. 

अजित पवार आज पुण्यात कोरोना रुग्णवाढीच्या मुद्द्यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार यांनीच तुम्हाला पाठवलं होतं असं म्हटलं जात आहे, याबाबत विचारलं असता अजित पवार चांगलेच संतापले. "हे बघा याबाबत मी वारंवार बोललो आहे आणि तरीही तुम्ही तेच तेच उगाळत बसले आहात. त्याबद्दल मी अगदी स्पष्टपणे याआधीच सांगितलं आहे की मी मला वाटेल तेव्हा मी बोलेन. तो माझा अधिकार आहे", असं अजित पवार म्हणाले. 

कोरोना वाढतोय, काळजी बाळगणं गरजेचंओमायक्रॉनचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. मी तर नेहमीच मास्क वापरण्याबाबत काटेकोरपणे सर्वांत सांगत आलो आहे. मुंबई आणि पुण्यात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढते आहे. त्यामुळे निर्बंधांबाबत सरकारला विचार करावा लागेल. ओमायक्रॉनची तीव्रता सौम्य असली तरी तो कोरोनाच आहे हे जनतेनं लक्षात घ्यावं. त्यामुळे जास्तीत जास्त काळजी बाळगणं गरजेचं आहे. राजकीय नेत्यांनीही लग्न समारंभांबाबत जरा सामाजिक भान राखून निर्णय घ्यावेत, असं अजित पवार म्हणाले. 

चंद्रकांत पाटलांनाही दिलं प्रत्युत्तरविधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेऊन महाविकास आघाडी सरकारनं असमजूतदारपणा दाखवून दिला आहे अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना 'काही जणांना समजूतदारपणा काय आणि असमजूतदारपणा काय हेच कळत नाही. आम्ही निवडणूक घ्यायला तयार होतो. पण राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळे आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करत समजूतदारपणाचच काम केलं आहे", असं अजित पवार म्हणाले. 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याSharad Pawarशरद पवार