शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Ajit Pawar : "लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ले घातक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी"

By निलेश राऊत | Updated: April 8, 2023 18:12 IST

सध्या घडत असलेल्या घटना पाहता अघोषित आणीबाणी येत आहे की काय असा प्रश्न पडत असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले....

पुणे : लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर राज्यात आज चौफेर हल्ले होत आहेत. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने घातक असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होत असलेली गळचेपी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही. सध्या घडत असलेल्या घटना पाहता अघोषित आणीबाणी येत आहे की काय असा प्रश्न पडत असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

पवार म्हणाले, सध्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जाणीवपूर्वक हल्ले सुरू आहेत. कोकणात पत्रकाराची हत्या झाली. मागील आठवड्यात एका पत्रकाराला मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते दम देतात. छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये खोके यावरून रॅप साँग करणाऱ्याला जेलमध्ये टाकले. खोका हा उल्लेख केला परंतु, त्याला अटक करून संबंधितांनी खोक्याचे एक प्रकारे समर्थन केले आहे. पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकाराला शाई फेकीच्या गुन्ह्यात गोवले गेले. तेव्हा पत्रकारांनी एकजूट केल्यावर त्या पत्रकाराला गुन्ह्यातून वगळले गेले. सुसंकृत महाराष्ट्रात हा प्रकार एक शोकांतिका असून, असे हिणकस प्रकार थांबले पाहिजेत. यासाठी सगळ्यांनी एकजूट करण्याची गरज आहे. म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये. यापुढे पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत.

ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर लिखित, ' धडपड ' या पुस्तकाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ॲड. अमरसिंह जाधवराव, ज्ञानेश्वर भोईटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, चंद्रकांत भुजबळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांची संघर्ष गाथा धडपड या पुस्तकामधून मांडली आहे. केवळ राजकारणी व्यक्तींच नव्हे तर समाजकारणात काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी हे पुस्तक आवश्य वाचावे असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. पुस्तकाचे लेखक श्याम दौंडकर यांनी प्रास्ताविक केले, प्रदीप देशमुख यांनी सुत्रसंचालन केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणे