Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. दरम्यान, या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यांनी 'डीजीसीए'वर गंभीर आरोपही केले आहेत. तर दुसरीकडे रोहित पवार यांच्यावर टीका सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण थांबले आहे, त्यामुळे रोहित पवार प्रेशर आणत असल्याची टीका होत आहे. यावर आता आमदार रोहित पवार यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची एक आठवण सांगितली. अजित पवार यांची दोन्ही पक्ष एकत्र यावेत ही भावनिक इच्छा होती असे रोहित पवार म्हणाले.
पीएम मोदींच्या दरबारी मंत्र्यांची 'परीक्षा'! होणार कामाचं प्रेझेंटेशन; सर्वांच्या कामाचा आढावा घेणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सध्या विविध चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार रोहित पवार यांनी एक भावनिक आठवण सांगितली. "सुरुवातीला मीच म्हणालो होतो की, आता विलीनीकरण करून काही फायदा नाही. मात्र, अजितदादांची एकत्र येण्याची एक भावनिक इच्छा होती. एकत्र येणे ही त्यांची इच्छा होती"
"अजितदादांचे वडील अनंतराव पवार यांचे निधन झाले तेव्हा दादा अवघ्या १८ वर्षांचे होते. त्यानंतर शरद पवार साहेबांनीच अजितदादांना स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळले. हे दादांच्या मनात कायम आहेत. जेव्हा रेवती सुळे हिचे लग्न ठरल्याचे सांगण्यासाठी शरद पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला होता. मात्र, त्यावेळी साहेबांना कफ झाल्यामुळे नीट बोलता येत नव्हते. पवार साहेब काय बोलतात हे दादांना कळत नव्हते, ही परिस्थिती बघितल्यामुळे दादांच्या डोळ्यात पाणी मी बघितले आहे. मग ही भावनिक भूमिका असताना याच्यामध्ये आम्ही राजकारण का करू?, असा सवाल रोहित पवार यांनी केला.
Web Summary : Rohit Pawar demands inquiry into Ajit Pawar's alleged plane crash. He recalls Ajit Pawar's emotional desire for NCP unity, sharing a touching anecdote about Sharad Pawar and Ajit's bond during a family event, dismissing political motives.
Web Summary : रोहित पवार ने अजित पवार के कथित विमान दुर्घटना की जांच की मांग की। उन्होंने शरद पवार और अजित के बंधन के बारे में एक मार्मिक किस्सा साझा करते हुए, राकांपा एकता के लिए अजित पवार की भावनात्मक इच्छा को याद किया, राजनीतिक उद्देश्यों को खारिज किया।