शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्हीच पाहा, कसा कारभार करतायत ते...'; रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 16:30 IST

अजित पवारांची राज्य सरकारवर बोचरी टीका...

बारामती (पुणे): सरकार स्थापन करुन महिना पूर्ण होत आला आहे. तरीही मंत्रीमंडळ स्थापनेला मुहुर्त मिळत नाही. लोकांचे अनेक प्रश्न रखडले आहेत. आता जनतेनेच पाहावे राज्यात कशा प्रकारे कारभार सुरु आहे आणि याला कोण जबाबदार आहे, असा टोला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.

विरोधी पक्षनेते शुक्रवारी (दि. ५) बारामती दौऱ्यावर होते. यावेळी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात त्यांचा जनता दरबार पार पडला. नागरीकांच्या तक्रारी, समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना पवार यांनी सूचना दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली.

यावेळी विधान सभा विरोधी पक्षनेते पवार म्हणाले, पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली आहे, त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. गावातील रस्ते, पुलांची दुरावस्था झाली आहे. तातडीने त्यांना मदतीची गरज आहे.

याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपाल महोदयांना भेटून राज्यमंत्री मंडळ अस्तित्वात येणे गरजेचे आहे. पावसाळी अधिवेशन जुलैमध्येच होते. ऑगस्ट महिना उजाडला तरी पावसाळी अधिवेशन घेण्यात आलेले नाही. त्यांना ग्रीन सिग्नल मिळेना, त्यांच्यात एकवाक्यता होईना. मंत्रीमंडळ स्थापनेसाठी कोणाला घाबरताय, हे काही समजायला तयार नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस