शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादा ऍक्टिव्ह नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा ? वाचा काय म्हणाले अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 11:34 IST

अजित पवार म्हणाले, " काही गोष्टी या दाखवायच्या नसतात...

पुणेपुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (ajit pawar) हे अद्यापही सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. या चर्चेवर आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यातील पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

अजित पवार म्हणाले, " काही गोष्टी या दाखवायच्या नसतात. नाराज कार्यकर्त्यांना कसं खूश करायचं हे मला चांगलंच माहीत आहे. 1992 पासून मी राजकारणात काम करत असून आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. निवडणुकी संदर्भातल्या बर्‍याचशा गोष्टी उघड उघड करायच्या नसतात. आमचं काम योग्य रीतीने सुरूच आहे. तरीही कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांना समजावून सांगण्याचे काम आम्ही करू".

अजित पवार म्हणाले, सध्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याला माझे प्राधान्य आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला अर्थसंकल्पात किती रक्कम द्यायची, त्यांच्या मागण्या काय आहेत? याबद्दल सरकारची भूमिका काय असली पाहिजे? या कामात मी सध्या व्यस्त आहे.. पक्षाच्या कामासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी त्यांचं काम योग्य रीतीने करत आहेत. 

महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असताना ही निवडणुकीसाठी प्रभाग रचना अजून जाहीर झाली नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी ज्या अजित पवारांवर अवलंबून आहे ते अजूनही शहरात सक्रिय झालेले दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये सुरू आहेत. अजित पवारांच्या या उत्तराने आता या चर्चेला विराम बसेल.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक