शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांची आई TV बघत असतानाच आलेली वाईट बातमी, स्टाफने लगेच कापून टाकली केबल, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 10:14 IST

Ajit Pawar Death, Mother Ashatai Pawar: बारामतीत विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला

Ajit Pawar Death, Mother Ashatai Pawar: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी विमान अपघातात मृत्यू झाला. सकाळच्या सुमारास त्यांचे विमान मुंबईतून बारामतीकडे निघाले. बारामतीत विमान लँडिंग होणारच होते, त्यावेळी तांत्रिक बिघाडामुळे ८.४५ वाजता बारामती विमानतळाजवळ त्यांचे चार्टर्ड विमान कोसळले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विमान कोसळल्यानंतर काही स्फोट झाले आणि मग भीषण आग लागून धुराचे लोट दिसू लागले. या घटनेनंतर काही वेळातच ते विमान अजित पवारांचे असल्याचे समजले. याचदरम्यान, अजित पवारांच्या आई टीव्ही पाहत होत्या. त्यावेळी काय घडले, याची माहिती समोर आली आहे.

अजित पवारांच्या आई तेव्हा टीव्ही पाहत होत्या...

अजित पवार यांचे विमान बारामतीत कोसळले. विमानात एकूण ५ जण होते. ते सर्वजण गंभीर जखमी झाले असावेत, हे अपघाताची परिस्थिती पाहताच स्पष्ट झाले होते. या अपघाताचे रिपोर्टिंग टीव्ही चॅनेलवरही सुरु झाले होते. याचवेळी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार टीव्ही पाहत होत्या. अपघाताच्या वेळी त्या बारामतीतील फार्महाऊसमध्ये होत्या. जेव्हा टीव्हीवर बातम्या सुरु झाल्या, त्यावेळी अजितदादांच्या मातोश्रींना या बातम्या कळू नयेत आणि त्यांना धक्का बसू नये, म्हणून फार्महाऊसची केबल कट करण्यात आली. फार्महाऊसचे व्यवस्थापक संपत धायगुडे म्हणाले की, आशा ताईंनी विचारले- दादांचा अपघात झाला का? आईला तिच्या मुलाच्या मृत्यूची बातमी मिळू नये म्हणून आम्ही ताबडतोब बंगल्यातील टीव्ही केबल कापली. त्यांचा मोबाईल फोनही फ्लाइट मोडवर ठेवला होता. आम्ही त्यांना सांगत होतो की काहीही झाले नाही.

शेवटपर्यंत कामात व्यग्र; अपघातस्थळी कागदांचा ढीग

अजित पवार दर मंगळवारी आपल्या मंत्री आणि आमदारांची 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी बैठक घेत. मंत्रालयातील बैठका आटोपून देवगिरीवर परतलेल्या अजित पवारांनी त्यानंतर नेहमीप्रमाणे मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी पक्षाची तयारी आणि इतर बाबींचा आढावा घेतला. त्यानंतर ते बुधवारी सकाळी निघाले. त्यांच्या विमानाचा अपघात झाला तेव्हा आजुबाजूला अनेक कागदपत्रांचा ढीग पडला होता. त्यावरूनच पुन्हा एक स्पष्ट झाले की, लोकांसाठी कामाचा माणूस शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's death hoax: Mother shielded from false news report.

Web Summary : A false report of Ajit Pawar's plane crash deeply affected his mother. Staff immediately cut the TV cable to prevent her from seeing the news and hid the truth about the incident. He was busy with work until his last moments.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस