शिरूर: जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी निवडणूक रिंगणात महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे राहिले होते. त्यामुळे दोस्तीत कुस्ती पाहायला मिळाली. मात्र, आता या कुस्तीचा आज निकाल लागणार आहे. आतापर्यंत विजय आमचाच म्हणणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकू लागला आहे. कोण कोणाला चितपट करणार आणि कोण किती पाण्यात आहे याचाही फैसला आहे. शिरूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एश्वर्या पाचर्णे 2894 मतांनी आघाडीवर आहेत.
शिरूरमध्ये पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादी, भाजप आणि शरद पवार गटाचे उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार गटात झाली आहे. दोन नंबरवर भाजपच्या सुवर्णा लोळगे 2400 मत, तीन नंबरवर शरद पवार गटाच्या अलका खंडरे 2246 मत मिळाली आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या रोहिणी बनकर 151 मतांनी ४ नंबरवर आहेत. वैशाली वखारे यांना 221 मत आतापर्यंत मिळाली आहेत.
शिरूरमध्ये पहिल्या फेरीअखेर अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर शिंदे गटाचा उमेदवार पिछाडीवर आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यावर लढत होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता मात्र भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये लढत सुरु आहे.
दुसरी फेरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व एकूण मते
1) एश्वर्या पाचर्णे (राष्ट्रवादी अजित पवार गट) - 60032) सुवर्णा लोळगे (भाजप ) - 48183) अलका खंडरे (राष्ट्रवादी शरद पवार गट) - 44394) रोहिणी बनकर ( शिवसेना शिंदे गट)- 2185) वैशाली वखारे - 4076) नोटा - 113
Web Summary : In Shirur Nagar Parishad election, Ajit Pawar's NCP leads after the first round. BJP follows, while Shinde group trails. A close contest is seen between NCP and BJP, contrary to earlier expectations of NCP versus Sharad Pawar group.
Web Summary : शिरूर नगर परिषद चुनाव में पहले दौर के बाद अजित पवार की एनसीपी आगे है। भाजपा पीछे है, जबकि शिंदे गुट पीछे चल रहा है। एनसीपी और भाजपा के बीच कड़ी टक्कर है, जबकि पहले एनसीपी और शरद पवार गुट के बीच मुकाबला होने की उम्मीद थी।